'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'

'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'

शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. 

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार

ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, दोन दिवस पाऊस गायब झाल्याने शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यावरचे सावट दूर झाले आहे. पावसामुळे मेळावा होणार की नाही, याची कुजबुज सुरु होती. मात्र, शिवसेनेने मेळावा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवतिर्थावर वाघाची डरकाळी घुमणार आहे.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन

मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.

शिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले

शिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले

गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?

सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?

सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय. 

पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?

पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?

पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. 

 

शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा, राज फोडणार प्रचाराचा नारळ

शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा, राज फोडणार प्रचाराचा नारळ

तब्बल सात वर्षांनंतर शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्क इथं मनसेला जाहीर सभा घेण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.

मुंबईत फडकणार सगळ्यात मोठा तिरंगा ?

मुंबईत फडकणार सगळ्यात मोठा तिरंगा ?

मुंबईची मान आता आणखी उंचावणार आहे.

सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा

मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज, शिवसेनेचा निशाणा भाजपवर?

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज, शिवसेनेचा निशाणा भाजपवर?

यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडतोय. पावसामुळं हुकलेल्या वर्धापन दिनाच्या खेळीची कसर भरुन काढण्याची तयारी शिवसैनिकांनी केलीय. शिवसेना भाजप वादामुळे अवघ्या देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलंय.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. 

सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क'

सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क'

शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष... यानिमित्तानं शिवसेनेला पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची इच्छा आहे.

शिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली

शिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली

मुंबईतल्या शिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली करण्यात आली आहे. राज्य सरकारनं एमआरटीपी कायद्यात बदल केल्यामुळं शिवाजी पार्कवरील राजकीय सभा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Update - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी

Update - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन. बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज संपली आणि तमाम महाराष्ट्राच्या काळजात चर्र झालं.. आज शिवाजी पार्कावर येऊन आपल्या या लाडक्या नेत्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी लाखो शिवसैनिकांची पाउलं दादरकडे वळणार आहेत.

यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!

मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

आता, हेरिटेज समितीचीच होणार चौकशी!

शिवाजी पार्क हेरिटेज म्हणून जाहीर करणाऱ्या मुंबईतील हेरिटेज समितीचीच चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.

‘शिवसेनाप्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कातच’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क परिसरातच होईल, अन्य कुठेही नाही अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलीय.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची गैरहजेरी!

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने शिवाजी पार्क पुन्हा गहीवरलं. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतीदिनादिवशी स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे मात्र यावेळी उपस्थित नव्हते.

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही - जयदेव

शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडलीय.