'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'

'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'

ठाणे मनपासाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.

मोदींवर टीका करताना निरुपम यांनी पातळी सोडली

मोदींवर टीका करताना निरुपम यांनी पातळी सोडली

नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली.

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको,  संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. 

निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसैनिकांची दगडफेक

निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसैनिकांची दगडफेक

उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व मधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक करण्यात आली. 

रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती नको - संजय निरुपम

रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती नको - संजय निरुपम

मुंबई : राज्यात ऑटोरिक्षांचे परवाने मिळवण्यासाठी चालकाला किमान मराठीचे ज्ञान आवश्यक असण्यासंबंधीचा निर्णय वाहतूक मंत्र्यांनी घेतला होता.

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संजय निरुपम एकाकी

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन संजय निरुपम यांचा गुरुदास कामत यांनी निषेध केलाय. 

'...तर निरुपम स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत'

'...तर निरुपम स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत'

संजय निरुपण यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसेला मात्र झिणझिण्या आल्यात. 'दादरमध्ये येऊन जर त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना हात जरी लावला तर ते परत जाताना स्वत:च्या पायाने चालत जाऊ शकणार नाहीत. बोलणं आणि करणं यात फरक असतो. कार्यकर्त्यांच्या बळावर हे करावं लागतं, काँग्रेसकडं नेते अधिक आहेत, परंतु कार्यकर्त्यांची वाणवा असल्यामुळं त्यांनी अशी भाषा वापरू नये' असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिलंय

'निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या'

'निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या'

मुंबईतल्या फेरीवाल्यांवरील कारवाईवरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेत जोरदार जुंपणार असल्याचं दिसतंय. 

राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला

राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केलाय. 

काँग्रेस तिकीटावर तर मोदीही निवडणूक हरले असते - निरुपम

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं जर नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली असती, तर ते सुद्धा हरले असते. निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होऊ शकतो.

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

भाजप तुपाशी, उद्धव - राज उपाशी : निरुपम

भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यादरम्यान सध्या सुरु असलेल्या सत्तेच्या जोड-तोडीमध्ये आता काँग्रेसनंही तोंड खुपसलंय.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

वीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा

मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याची मागणी अपरिपक्व असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम हे नागपूरमध्ये असं म्हणाले.

ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम

नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.

राजीव गांधी यांच्या नावावर...

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

सकारात्मक प्रांतवाद असावा...

दीपक पवारराजकीय विश्लेषक निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.