गोरक्षकांच्या मुद्द्यावरुन औवैसींची आरएसएस आणि सरकारवर टीका

गोरक्षकांच्या मुद्द्यावरुन औवैसींची आरएसएस आणि सरकारवर टीका

 

औरंगाबाद : गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला. यासाठी शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या मौलाना आझाद चौक ते भडकल गेटपर्यंत खामोश मोर्चा काढण्यात आला.

Jul 23, 2017, 12:23 PM IST
सरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय

सरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय

कोणी सरकारवर टीका केली. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या कोणावरही देशद्रोह किंवा बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

महाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका

महाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.

‘...तर सत्ता सोडा’, उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली

सीएसटी हिंसाचारावरुन राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर सडकून टीका केलीय. ‘सरकार चालवता येत नसेल, तर खाली उतरा’ असा सल्लाच त्यांनी सरकारला दिलाय.

अण्णा आले, गर्दीही आली!

जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.

अण्णा आजपासून बसणार उपोषणाला...

अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.

गर्दी नको तर दर्दी हवेत - अण्णा हजारे

अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.