'नोटाबंदी जालियनवाला बागच्या गोळीबारापेक्षाही भयंकर'

'नोटाबंदी जालियनवाला बागच्या गोळीबारापेक्षाही भयंकर'

सामनाच्या संपादकीयात आज नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय. 'रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता', अशा शब्दात संपादकीयातून मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. 

'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड

'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड

पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे

नितेश राणेंकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

नितेश राणेंकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

 सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवलिये. 

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेचा  उशीराचा माफीनामा !

शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

वादग्रस्त व्यंगचित्रानंतर 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झालाय. आजच्या सामनाच्या पुरवणीत हसोबा प्रसन्न हे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्राचे सदर प्रसिद्ध झालेल नाही.

'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

'सामना'तील कार्टूनप्रकरणी संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या जर भावना दुखवल्या असतील त्यांची बाळासाहेबांचा पूत्र म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव म्हणालेत.

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

व्यंगचित्राबाबत 'सामना'तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी

व्यंगचित्राबाबत 'सामना'तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी

सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राबाबत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना

संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना

नवी मुंबईत शिवसेनेचे मुखपत्र दैनिका सामनावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे.

शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या नवी मुंबईतल्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक तर ठाण्यात कार्यालयात शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल छापलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झालाय. त्याचं पर्यवसन सामनाच्या आस्थापनांवरील हल्ल्यात झालंय.

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. गेल्या आठवड्यात सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

मराठा मोर्चाबाबत 'सामना'त आक्षेपार्ह व्यंगचित्र, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

मराठा मोर्चाबाबत 'सामना'त आक्षेपार्ह व्यंगचित्र, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं

सामना वर्तमानपत्रात मराठा समजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले.

'खडसेंची वाटचाल तपस्येकडून विरक्तीकडे'

'खडसेंची वाटचाल तपस्येकडून विरक्तीकडे'

सामनातून एकनाथ खडसेंच्या पक्ष हद्दपारीवर खोचक टोलेबाजी करण्यात आली आहे. 

ब्रॉडकास्टर्सच्या चिंता वाढल्या, वर्ल्डकपमध्ये नाही होणार भारत-पाकिस्तान सामना

ब्रॉडकास्टर्सच्या चिंता वाढल्या, वर्ल्डकपमध्ये नाही होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरतो. काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या फक्त इवेंट मॅचमध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत.

शाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

शाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड चिली या कंपनीने  सामना वृत्तपत्रात शुभेच्छांची जाहिरात दिली आहे. रेड चिली ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी आहे. 

२५ वर्ष युतीत सडली आता स्वबळाची तयारी, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

२५ वर्ष युतीत सडली आता स्वबळाची तयारी, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट केलंय.

'सामना'तून मोदींचं कौतुक आणि शालजोडीतले वारही!

'सामना'तून मोदींचं कौतुक आणि शालजोडीतले वारही!

मोदींच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाची स्तुती करणाऱ्यांच्या यादीत आज शिवसेनेचंही नाव जोडलं गेलंय.

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं.