उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला. 

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

भल्यामोठ्या अजगरानं भेकराला गिळलं

भल्यामोठ्या अजगरानं भेकराला गिळलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली जकातवाडी इथे रिलायन्स टॉवर जवळ अजगारानं एका भेकराला गिळल्याची घटना घडली. सुमारे १० ते १५ किलो वजनाच्या भेकराला गिळल्यानं अजगर सुस्त होऊन तसाच पडला होता. या अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. 

कोकणात मान्सूनपूर्व पाऊस

कोकणात मान्सूनपूर्व पाऊस

कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली. 

राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा

राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ दिसून येत आहे. ही क्रेज आता सिंधुदुर्गातही दिसून येणार आहे. राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये चक्क मोदी दिसणार आहेत.

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भाजप प्रवेश चर्चा आणि राणे सिंधुदुर्गात

भाजप प्रवेश चर्चा आणि राणे सिंधुदुर्गात

भाजपप्रवेशाच्या जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे सिंधुदुर्गात आहेत. राणे आज त्यांच्या मेडिकल कॉलेज संदर्भात व्यस्त असल्याचे दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यात  वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली

कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.

सिंधुदुर्गात शिवसेना- भाजप युतीचा नारळ फुटणार

सिंधुदुर्गात शिवसेना- भाजप युतीचा नारळ फुटणार

महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणारे शिवसेना आणि भाजप आता पुन्हा एकत्र येतील का अशी चिन्ह दिसू लागले आहेत. मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी युती होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. स्थानिक पातळीवर सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून निवडून आलेले सदस्यांनी काँग्रेसमध्ये जावू नये म्हणून शिवसेना आणि भाजपने काही ठिकाणी वैयक्तिक स्तरावर युती केली आहे. देवगड, वैभववाडी आणि वेंगुर्ला या पंचायत समित्यांसाठी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून गट स्थापन करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्चला

आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्चला

सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यंदा 2 मार्चला होणार आहे. प्रति पंढरपूर नावाने आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. 

हा माझा कमबॅक नाही, मी आहे तिथेच - नारायण राणे

हा माझा कमबॅक नाही, मी आहे तिथेच - नारायण राणे

 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना-भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, नोटबंदी, वाढती महागाई, अशा अनेक विषयांवर लोकांमध्ये रोष असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय. 

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत

सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. 

स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग देशात अव्वल

स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग देशात अव्वल

 देशातील स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा अव्वलस्थानी आहे. 2016 स्वच्छ सर्वेक्षणानुसार स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत 75 जिल्ह्यांचा समावेश आहे. 

सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली

सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली

सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!

वाहन चालकांनो, आंबोली घाटातून जाताना जरा जपून!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात रस्ता खचलाय. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय.