सुब्रतो रॉय यांना जामीनासाठी द्यावे लागणार १०,००० करोड रुपये!

सुब्रतो रॉय यांना जामीनासाठी द्यावे लागणार १०,००० करोड रुपये!

सुप्रीम कोर्टानं आज सहारा प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांना सशर्त जामीन मंजूर केलाय. सुब्रतो रॉय यांना जामीन हवा असेल तर त्यांना तब्बल 10 हजार करोड रुपये परत केल्यानंतरच तो मिळू शकेल, असं शिखर न्यायालयानं म्हटलंय. 

माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास - सुब्रतो

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी शुक्रवारी पोलिसांना समर्पण केलं होतं. मात्र बराच वेळ आपल्या लखनौमधील सहारा शहरमध्ये थांबून, ते न्यायालयाकडे रवाना झाले.

`सहारा`चे सुब्रतो रॉय यांना पोलीस कोठडी

सहारा उद्योगसमूहाचे मालक सुब्रतो रॉय यांनी आज शुक्रवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

सहारा ग्रुपचे सुब्रतो रॉय यांच्या अटकेचे आदेश

सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात हजर न राहिल्यानं त्यांना त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलाय.

सुब्रतो रॉय २४ हजार कोटी भरणार?

सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय आणि सहाराचे तीन वरिष्ठ अधिकारी सेबीसमोर हजर झाले आहेत. सहारामधल्या गुंतवणूकदारांचे तब्बल २४ हजार कोटी परत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

गुंतवणूकदारांना बेसहारा करणाऱ्या सहाराची खाती गोठवली

वारेमाप प्रलोभने देऊन नंतर गुंतवणुकदारांना `बेसहारा` करणाऱ्या सहाराच्या सुब्रतो रॉय यांना धक्का बसला आहे. सेबीनं बुधवारी केलेल्या कारवाईत करोडो गुंतवणुकदारांना बेसहारा करणाऱ्या सहारा समुहाचे 100 पेक्षा अधिक खाती गोठावाली आहेत.