सुभाष देसाई

सुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना

सुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना

मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय. 

Aug 28, 2017, 06:40 PM IST
शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठिशी - उद्धव ठाकरे

शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठिशी - उद्धव ठाकरे

शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या पाठिशी असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय आहे.

Aug 13, 2017, 10:00 AM IST
सेनेच्या 'डॅमेज कंट्रोल'साठी देसाईंच्या राजीनाम्याचं नाटक : विखे पाटील

सेनेच्या 'डॅमेज कंट्रोल'साठी देसाईंच्या राजीनाम्याचं नाटक : विखे पाटील

सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, 'डॅमेज कंट्रोल'साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Aug 12, 2017, 07:20 PM IST
सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.

Aug 12, 2017, 11:08 AM IST
अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST
आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST
'सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार'

'सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार'

एकीकडे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे वळवला आहे.

Aug 8, 2017, 05:07 PM IST
विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aug 8, 2017, 02:15 PM IST
राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई

राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय. 

May 5, 2017, 08:20 PM IST
फेसबूकवर नको ते उद्योग, आर्ची म्हणून उद्योगमंत्र्यांना फोन

फेसबूकवर नको ते उद्योग, आर्ची म्हणून उद्योगमंत्र्यांना फोन

  आपल्या अप्रतिम अभिनयाने सैराट या पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरूमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची डोकेदुखी वाढली आहे.  राष्ट्रीय पुरस्कारानंतर रिंकू राजगुरूला अभिनंदनाचे फोन सुरू आहे. पण ते फोन रिंकूकडे न जाता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जात आहे. 

May 9, 2016, 05:52 PM IST
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेची स्पष्ट नाराजी

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेची स्पष्ट नाराजी

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर मंत्रिमडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आलीय. 

Nov 23, 2015, 12:08 PM IST
सावधान! स्टील उद्योग बंद होण्याची भीती

सावधान! स्टील उद्योग बंद होण्याची भीती

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा इथल्या स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं बुधवारी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन इथं भेट घेऊन वाडा, जिल्हा पालघरच्या स्टील उद्योगांना स्वस्तदरानं वीज देण्याची मागणी केली. 

Sep 23, 2015, 06:48 PM IST
चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका

चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका

धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय. 

May 18, 2015, 07:21 PM IST
पुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना

पुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना

पुढल्या वर्षीपासून शासकीय शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी केली जावी अशी मागणी शिवसेनेनं केलीये. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलीये. आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तशी मागणी केल्याचं ते म्हणाले. 

Feb 19, 2015, 11:15 AM IST
आशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई

आशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कालच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. युतीबाबत निर्णय घेणारे आशिष शेलार कोण आहेत असा सवाल देसाईंनी केलाय. तसंच युती ठरवण्याएवढे शेलार हे ज्येष्ठ नेते नसल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. 

Feb 11, 2015, 02:54 PM IST