चंदू चव्हाण गावी परतणार

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

लष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात

लष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात

लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. 

सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव

सीमेवर पाकिस्तानचं सैन्य करतंय युद्ध सराव

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच बातमी होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधरावे म्हणून पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधित प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज हे भारतात येणार आहेत. पण यातच आता दुसरी माहिती येते आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवर मिलिट्री एक्सरसाइज करत आहे.

आम्ही सांगितलं होतं फौजेत भरती व्हायला? ओम पुरीकडून शहिदांचा अपमान

आम्ही सांगितलं होतं फौजेत भरती व्हायला? ओम पुरीकडून शहिदांचा अपमान

बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सैन्य आणि शहीदांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलंय.

पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं मारले २० दहशतवादी

पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यानं मारले २० दहशतवादी

जम्मू - काश्मीरमध्ये उरीच्या सेना मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत 'लाईन ऑफ कंट्रोल' पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. यावेळी, २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना  वीरमरण आलं. 

राजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!

राजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!

आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता. 

... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी

... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी

'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."

आता ट्रांसजेंडर्संना  मिळणार सैन्यात जाण्याची संधी

आता ट्रांसजेंडर्संना मिळणार सैन्यात जाण्याची संधी

अमेरिका आपल्या सशस्त्र सैन्यात ट्रांसजेंडर्सवर लावलेले सगळे निर्बंध काढून टाकणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कॉर्टर यांनी केली आहे. 

हाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी

हाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी

दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय. 

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

पाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार

पाकच्या ना'पाक' कारवाया सुरूच, गोळीबारात काश्मीभरमध्ये 5 ठार

जम्मूतील तंगधार सेक्टर इथं भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना सुरक्षा दलांच्या जवानांशी चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 

भारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

भारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. 

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं

चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. 

राजनाथ खुर्चीवर बसून; जवान चढवतायत पायांत बूट

राजनाथ खुर्चीवर बसून; जवान चढवतायत पायांत बूट

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा एक फोटोची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोत राजनाथ सिंह सैन्यातील एका जवानाकडून आपल्या बूट घालून घेताना दिसत आहेत. 

चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी

चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी

क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.    

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

गरज भासल्यास इराकमध्ये सैन्य घुसवू - अमेरिका

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.

एसी हॅल्मेट डोक्याला ठेवणार `ठंडा ठंडा, कूल कूल`

अमेरिकेच्या संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हॅल्मेट शोधून काढलं आहे. या हॅल्मेटचं वैशिष्ट म्हणजे यात एसी लावण्यात आलेला आहे. याचं दुसरं वैशिष्ट म्हणजे या हॅल्मेटमध्ये बॉम्ब हल्लाही सहन करण्याची क्षमता आहे.