हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार मराठा मोर्चा

हिवाळी अधिवेशनात नागपूरला मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे. 14 डिसेंबरला मराठा क्रांती मोर्चा नागपुरात निघणार आहे. 

राज्याचं हिवाळी अधिवेशन ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर

राज्याचं हिवाळी अधिवेशन ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके आणि विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार आहे, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला

संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे.  त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

विरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री

विरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना आणि राष्ट्रगीत न होता अधिवेशन स्थगित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी  अधिक आक्रमक पाहायला मिळालेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. विरोधकांची स्थिती गोंधळेली आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित

भाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित

राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत

हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. 

नागपुरात संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

नागपुरात संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

राज्यभरातील संगणक परिचालकांनी आज सकाळी विधानभवनावर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यावेळी आंदोलकांना दगडफेक केल्याची घटना घडली. दरम्यान, अनेक जणांची धरपकड पोलिसांनी केली.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात

सरकार आणि विरोधक आपापपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेलाय. 

शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांसह भाजपची केली कोंडी

शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांसह भाजपची केली कोंडी

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, विदर्भाबाबत चाचपणी करणाऱ्या अणेंविरोधात हक्कभंग आणलाय.

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

बरोबर वर्षभरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या विधीमंडळाच्या इमारतीत आजपासून अधिवेशनाला सुरूवात होतेय. दुष्काळ, नापीकी आणि महागाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखलीय. 

हिवाळी अधिवेशनावर विधान परिषद निवडणुकीचे सावट

हिवाळी अधिवेशनावर विधान परिषद निवडणुकीचे सावट

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर विधान परिषद निवडणुकीच्या आचार संहितेचे सावट असणार आहे. सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच होणार

राज्य मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच होणार

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळाले आहेत. हिवाळी अधिवेशानापू्र्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या कोर कमिटीने विस्ताराला हिरवा कंदील दिलाय.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?

उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

सत्ताधारींनी पाडली छाप, विरोधक ठरले निष्प्रभ

सत्ताधारींनी पाडली छाप, विरोधक ठरले निष्प्रभ

नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या गरमागरम हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं... या अधिवेशनात दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी 7 हजार कोटी रूपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं... 

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे

काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.

धनंजय मुंडे विधानपरिषद तर विखेपाटील विधानसभा विरोधी पक्षनेते

धनंजय मुंडे विधानपरिषद तर विखेपाटील विधानसभा विरोधी पक्षनेते

विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष रहिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जाहीर केले. आणि गेल्या दिवसांपासून सुरु असलेला गोंधळ सुपुष्टात आला.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

 सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात इसमाने फोनवरुन शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय.