१९९३ बॉम्बस्फोट

मुंबई १९९३ बॉम्बस्फोटातील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकानं एकत्रितपणे ही कारवाई करत, उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून कादिर अहमद याला ताब्यात घेतलं आहे.

Jul 9, 2017, 03:34 PM IST

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

Jun 28, 2017, 02:22 PM IST

तुरुंगात असताना याकूब मेमनने काय केले?

नागपूर तुरुंगात असताना याकूब मेमनने आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवला. त्याने या काळात दोन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. एक रिपोर्ट.

Jul 30, 2015, 10:15 AM IST

याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत

बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.

Jul 30, 2015, 09:25 AM IST

संजय दत्तची येरवड्यात रवानगी

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी संजय दत्त याला आज पहाटे आर्थर रोडमधून येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलंय. गुरुवारी, १६ मे रोजी त्यानं टाडा कोर्टासमोर शरणागती पत्करली होती.

May 22, 2013, 09:55 AM IST

`संजय दत्तला माफी, मग माझ्या आईला का नाही?`

बॉम्बस्फोटाप्रकरणातील एक दोषी जैबुनिसा कादरी हिच्या मुलीनंही आपल्या आईच्या सुटकेची मागणी पुढे केलीय. संजय दत्तला माफी मिळू शकते, तर माझ्या आईला का नाही? असा सवालच तीनं केलाय.

Mar 26, 2013, 10:09 AM IST

कलाकार कायद्यापेक्षा मोठी नाही – मुंडे

संजय दत्तच्या माफीला भाजपानं विरोध केलाय. कलाकार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा योग्य आहे, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

Mar 23, 2013, 12:22 PM IST

नायक ते खलनायक

बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...

Mar 21, 2013, 11:55 PM IST