अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलनात बस पेटवण्याचा प्रयत्न

अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलनात बस पेटवण्याचा प्रयत्न

 पारनेर तालुक्यातील वडनेर येथील पारनेर आगाराची एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. वडनेर येथील काही लोकांनी एसटी पेटवून देऊन आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. 

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वच्छतेमध्ये अहमदनगरचं रेल्वे स्टेशन देशात तिसरं

स्वच्छतेमध्ये अहमदनगरचं रेल्वे स्टेशन देशात तिसरं

रेल्वे स्थानकातिल स्वच्छते बाबतीत देशभरात घेतलेल्या सर्व्हे मधे अहमदनगर रेल्वे स्टेशनने रेल्वे स्थानकाच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय. 

शेतकऱ्याचा विहिरीत ठिय्या... शिक्षण बाजुला ठेवत विद्यार्थीही सहभागी

शेतकऱ्याचा विहिरीत ठिय्या... शिक्षण बाजुला ठेवत विद्यार्थीही सहभागी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.

ग्रामीण भागात संपर्क यंत्रणेचा बोजवारा...

ग्रामीण भागात संपर्क यंत्रणेचा बोजवारा...

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडीया, मेक इन इंडीया अशा महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात आजही संपर्क यंत्रणेंचा बोजवारा उडालाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 15 गावांनी त्याचाच निषेध म्हणून आंदोलन केलं. 

मंत्री महोदय म्हणतात, 'बॅचलर ऑफ जेल' हीच माझी पदवी

मंत्री महोदय म्हणतात, 'बॅचलर ऑफ जेल' हीच माझी पदवी

शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

धक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं

धक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं

महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

वर्गात बडबड केली या कारणावरुन ११ मुलींना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात घडलीय. कडूस येथील माध्यमिक विद्यालयातील लिपीकाने हे अमानुष कृत्य केलंय.

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

नगरमध्ये राष्ट्रवादी-मनसेचं साटंलोटं; दिल्लीच्या निकालातून धडा नाहीच

नगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं साटंलोटं जमून आलंय.

मराठा आरक्षणाचा राग, एसटीच दिली पेटवून

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी एसटीला टार्गेट केले. आपला राग एसटीवर काढून गाडीच पेटवून दिली.

राज ठाकरेंवर होणार खटला दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरात झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.

तरुण मुलांवर पित्याचा हल्ला, मुलगी ठार!

अहमदनगरमध्ये जन्मदात्या पित्यानेच आपल्या तरुण मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. पित्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी आहे.

वारक-यांच्या ट्रकला अपघात

अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ वारक-यांच्या ट्रकला अपघात झालाय. ट्रकचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी जखमी झालेत.

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

टँकरनं पाच जणांना चिरडलं

अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये मळीच्या टँकरनं पाच जणांना चिरडलंय. मृतांमध्ये तीन पुरूष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

नगरलाच रंगणार राज्य नाट्य स्पर्धा

अहमदनगर इथेच ९ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कमी प्रवेशिका प्राप्त झाल्याचे कारण देत नगरच्या राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रद्द केलं होतं.

तुझ्या उसाला लागला कोल्हा...

सरकारी खात्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक येणं हा चमत्कार मानला जातो आणि प्रादेशिक साखर संचालनालय त्याला अपवाद कसा असू शकतो. संचालनालयाचा अहवाल आणि लागवडीखालील उसाचे क्षेत्र यात मोठी तफावत आहे.