काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.