खुलासा : साक्षीदारांना मारण्याचं प्लानिंग तुरुंगातून आसारामनंच केलं होतं

खुलासा : साक्षीदारांना मारण्याचं प्लानिंग तुरुंगातून आसारामनंच केलं होतं

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूच्या एका शिष्यानं एक मोठा खुलासा केलाय. आसारामविरुद्ध साक्षीदारांवर झालेले हल्ले हे पूर्वनियोजित होते... आणि या हल्ल्यांचा कट तुरुंगातूनच आसारामनं रचला होता, असं या शिष्यानं कबूल केलंय. 

नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे. 

आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज

आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज

लैंगिक शोषणच्या आरोपात अटक झालेले आसाराम बापू यांनना जोधपूरमध्ये एकदम व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. आसाराम यांच्यावर आश्रमातील १५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका बातमीत म्हटले आहे की, आसाराम यांना जेलमध्ये कोणतीच अडचण नाही. जेलमध्ये ते देखील ऐशो-आरामात राहत आहेत. 

आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आसाराम प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहचा मृत्यू

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहवर शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आलंय. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.

आसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार

आसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार

आसाराम बापूचा मुलगा नारायण साईच्या विरोधातला साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर आज गोळीबार करण्यात आलाय. 

सलमानला जामीन, मी वृद्ध पण मला नाही : आसाराम

सलमानला जामीन, मी वृद्ध पण मला नाही : आसाराम

 गुरूकूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाच्या आरोपात गुरूवारी आसाराम बापू सेशन कोर्टात दाखल झाले. कोर्टाच्या बाहेर आल्यावर मीडियाशी बोलताना सलमानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया दिली. 

बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

बलात्काराचा आरोप असणाऱ्या कैद्यावर गहमंत्र्यांची स्तुतीसुमनं...

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि विश्व परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल सध्या वादात अडकलेत. १६ वर्षांच्या तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात सध्या तुरुंगात बंद असलेल्या आसारामवर कौतुकाचा वर्षाव केल्यानं सिंह आणि सिंघल यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. 

आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या

आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या

अखिल गुप्ता या आसाराम खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे. अखिल गुप्ता यांच्यावर मुजफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली. 

आसारामविरुद्ध बोलणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेला प्रवचनकर्ता आसाराम याच्याविरुद्ध मुख्य साक्षीदार असलेल्या अमृत प्रजापती यांनी आज (मंगळवारी) अखेरचा श्वास घेतला.

आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला

सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

आसारामपुत्र नारायण साई `पलायनवादी` म्हणून घोषित

लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.

मीडियावर निर्बंध घालण्याची आसारामची मागणी

मीडियानं आपल्यासंबंधी नकारात्मक बातम्या देणं थांबवण्याचा आदेश देण्याचा आदेश देण्याची मागणी, सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूनं सर्वोच्च न्यायालयाकडे केलीय. सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तरुंगाची हवा खात आहे.

आसाराम बापूंची ‘ती’ सहकारी महिला मीडियासमोर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या आता आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. आसाराम यांचा खास सहकारी शिवा याने पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आसाराम बापूच्या अश्लील कृत्याबद्दल आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. त्यानंतर मस्थती करणारी महिलेचा चेहरा मीडियासमोर प्रथमच आला आहे.

अश्लील सीडी बनवून `बापू` करायचे ब्लॅकमेल?

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सध्या अटक झालेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्याबद्दल नवीन खुलासा झाला आहे. आसाराम बापू आपल्या महिला भक्तांची अश्लील सीडी बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्य़ात येत आहे.

सेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.

आसाराम बापू जेलमध्येच की बाहेर पडणार, आज फैसला

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.

आसाराम बापूंना १४ दिवसांची कोठडी

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.