आयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी? आयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी?

 आयपीएल सामन्यावेळी रंगारग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये अनेकवेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र ' इंडियन एक्स्प्रेस' ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या सीझनमध्ये एका व्यक्तीच्या जहाजावर प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबच्या खेळाडूंना पार्टी देण्याचे प्रकरण आयसीसीच्या अँटी करप्शनच्या स्कॅनरमध्ये आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूच्या रूममध्ये एका महिलेने रात्र घालविली तसेच शाहरुख खानच्या मित्राने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय केकेआरच्या खेळाडूंना डिनर पार्टीचे आयोजन करण्याचे प्रकरणही चौकशीच्या घेऱ्यात आहे.