baba ramdev

टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?

टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?

भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

Sep 28, 2017, 04:26 PM IST
रामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स

रामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स

योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.

Sep 27, 2017, 11:21 PM IST
रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.

Sep 11, 2017, 04:54 PM IST
राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...

राम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Aug 28, 2017, 10:03 PM IST
...आणि दलाई लामा यांनी रामदेव बाबांची दाढी खेचली

...आणि दलाई लामा यांनी रामदेव बाबांची दाढी खेचली

योगगुरू रामदेव बाबा जेव्हा व्यासपिठावर असतात तेव्हा आपल्या कलाकारीने सर्वांचे लक्ष ते सहज वेधून घेतात. पण यावेळेस असा काही प्रसंग घडला की रामदेव बाबा क्षणभरासाठी विचारात पडले. हा प्रसंग मुंबईत घडला. जेव्हा धर्मगुरू दलाई लामा आणि योगगुरू रामदेव बाबा एकाच व्यासपिठावर होते. त्यावेळी दलाई लामा यांनी रामदेव बाबांना स्वत: कडे बोलावून घेतले आणि ते जवळ आल्यावर त्यांची दाढी खेचली.

Aug 13, 2017, 05:07 PM IST
या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

Aug 3, 2017, 10:57 AM IST
'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री

'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री

'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे.

Jul 13, 2017, 08:58 PM IST
नेपाळमध्ये पतंजलीची ६ औषधे परिक्षणात नापास

नेपाळमध्ये पतंजलीची ६ औषधे परिक्षणात नापास

नेपाळच्या औषधे रेग्युलेटरने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची ६ आयुर्वेदिक औषधांना परिक्षण केल्यानंतर नापास केलं आहे. ही औषधे परत घेऊन जाण्य़ास सांगितले आहे. औषधे प्रशासन विभागाने एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं की, उतराखंडमधील दिव्य फार्मसीमध्ये बनलेली ६ औषधे ही परिक्षणात नापास झाली आहे. सूक्ष्मजीव संबंधी परिक्षणामुळे जी औषधे निकृष्ठ दर्जाची आढळली. ज्यामध्ये पतंजलीचे आवळा चूर्ण, दिव्य गसार चूर्ण, बहुची चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अगंधा आणि अद्वेय चूर्ण यांचा समावेश आहे.

Jun 23, 2017, 11:04 AM IST
अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

Jun 21, 2017, 08:42 AM IST
बाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

बाबा रामदेवांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

हरियाणाच्या एका कोर्टानं बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय.

Jun 15, 2017, 10:44 AM IST
रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

रामदेव बाबांच्या भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले...

योगगुरु बाबा रामदेव यांनी कृष्णकुंजवर जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असं मनसेच्या सूत्रांनी म्हटलं आहे. 

May 17, 2017, 11:57 AM IST
योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.

May 17, 2017, 09:13 AM IST
बाबा रामदेव सुरू करणार QSR

बाबा रामदेव सुरू करणार QSR

एफएमसीजी सेक्टरमध्ये पतंजलीच्या उत्पादनांनी भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता केएफसी आणि मॅकडॉनल्डससारख्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फास्ट फूड चेनला टक्कर देण्याची तयारी करत आहेत. 

May 5, 2017, 06:19 PM IST
पंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी  - बाबा रामदेव

पंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रऋषी असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. मोदींच्या हस्ते आज पतंजलीच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.

May 3, 2017, 02:53 PM IST
बाबा रामदेव यांच्या अपघाताचे वृत्त चुकीचे

बाबा रामदेव यांच्या अपघाताचे वृत्त चुकीचे

 बाबा रामदेव यांच्या गाडीला अपघात झाला, असे वृत्त सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हे वृत्त चुकीचे आहे. केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झालेय.  

Apr 25, 2017, 10:14 PM IST