कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा

कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा

कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय. 

मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र घोषणा देणं पडणार महागात

मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र घोषणा देणं पडणार महागात

कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांवर दडपशाहीचा कळस गाठलाय. बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्रची घोषणा देणं महागात पडणार आहे. 

दारु न दिल्याने पोलिसांकडून  हॉटेल मॅनेजरला मारहाण

दारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण

ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली.  हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

बेळगावात सापडले ७२ बॉम्ब

बेळगावात सापडले ७२ बॉम्ब

जिल्ह्यातील संकेश्वर शहराजवळ २५ लाँचिंग बॉम्ब आणि ४७ इतर बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.

प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या

प्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या

पती  बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.

आई आणि दोन मुलांचा निघृण खून

आई आणि दोन मुलांचा निघृण खून

बेळगाव शहरातील कुवेंपु नगरात  एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात आई, मुलगा आणि मुलगीचा खून करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

बेळगाव येथील नाट्य संमेलनात गोंधळ, जोरदार घोषणाबाजी

बेळगाव येथील नाट्य संमेलनात गोंधळ, जोरदार घोषणाबाजी

बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासीयांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासीयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनंती केल्यानंतर हा गोंधळ थांबला आणि त्यानंतर उदघाटन सोहळा पार पडला.

बेळगावचा लढा सुरूच राहील, नाट्य संमेलनाचा आखाडा नको - उद्धव

बेळगावचा लढा सुरूच राहील, नाट्य संमेलनाचा आखाडा नको - उद्धव

बेळगावचा लढा सुरूच राहील, मात्र नाट्य संमेलनाचा आखाडा करू नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

 ९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव

९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव

बेळगावी इथं होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ फ्रेबुवारीला नाट्यसंमेलन बेळगावीला होणार आहे. 

हुतात्मा दिनानिमित्ताने बेळगाव बंद

हुतात्मा दिनानिमित्ताने बेळगाव बंद

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात हौतात्म पत्कारलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज बेळगावमध्ये हुतात्मा दिन पाळण्यात आला. यावेळी बेळगावमधील व्यवहार बंद होते.

नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच

नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच

 बेळगावमध्ये होणा-या आगामी नाट्य संमेलनानिमित्त वादाच्या ठिणग्या सुरूच आहेत.

बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी

बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला

बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा, तणाव वाढला

बेळगावात कन्नडीकांचा धिंगाणा सुरु आहे. हजारो कन्नड कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे येळ्ळूर मध्येही ताणावाचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे अध्यक्ष नारायण गौडाला पोलिसांनी अटक केली आहे. 

शिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली

शिवसेना नेते रावतेंची कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषद उधळली

कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.

बेळगाववर राज्य सरकारच गंभीर नाही - राज ठाकरे

बेळगाववर राज्य सरकारच गंभीर नाही - राज ठाकरे

कर्नाटक सरकानं मराठी जनतेवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध केलाय.  

कर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा

कर्नाटकची दडपशाही, कोल्हापुरात शिवसेनेचा राडा

बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय. 

चिमुरडीला जिवंत पुरणाऱ्या भोंदूबाबाला अटक

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार केल्याप्रकरणी भोंदूबाबासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही - राहुल

भाजपला स्वत:चा भ्रष्टाचार दिसत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा बेळगावात केला. भाजपच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा चिमटा राहुल यांनी भाजपला काढला.

बेळगाव हिवाळी अधिवेशनात मराठीची गळचेपी

बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास मराठीतून सुरूवात केली.

ट्रक अपघातात २१ ठार, तीन बालकांचा समावेश

गुलबर्गामधून कोकणात सावंतवाडीकडे येणारा ट्रक बेळगाव-बागलकोट मार्गावर पलटल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये कामगारांचा समावेश होता. मृतांतमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. हलकीजवळ आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.