bharat ratna award

हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना मिळणार `भारतरत्न` !

हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची `भारतरत्न` पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्रालयामध्ये समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्य़ात आला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस यावेळेसही करण्यात आलेली नाही.

Jul 20, 2013, 03:22 PM IST