सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'

सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता. 

दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको स्वायत्तता द्या’

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको स्वायत्तता द्या’

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको, स्वायत्तता द्या’ असं म्हणत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला इशारा दिलाय.

‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!

‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!

१० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.

राज ठाकरे मनसेची 'ब्लू प्रिंट'  आज करणार प्रसिद्ध

राज ठाकरे मनसेची 'ब्लू प्रिंट' आज करणार प्रसिद्ध

मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट'आज गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांची साथ हवी, अशी साद  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी घातली आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'

घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तथाकथित ‘ब्लू प्रिंट’ २५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे. 

मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार

मनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. 

‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे

‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

याच महिन्यात येणार, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट

याच महिन्यात येणार, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित, महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिन्ट अखेर सर्वांच्या समोर येणार आहे. यासाठी राज ठाकरे हे तुमची उत्सुकता जास्त ताणून धरणार नाहीयत, कारण ही ब्लू प्रिन्ट याच महिन्यात प्रकाशित होणार आहे.

पुणेकरांचा मराठी बाणा

पुण्याचा नवीन विकास आराखडा आणि विकास नियमावली नगरसेवकांना मराठीमध्ये हवी आहे. बहुसंख्य नगरसेवकांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. त्यामुळे नवीन विकास अराखाड्यावरचा निर्णय एक महिना पुढं गेलाय.

‎'राज-रतन' भेट, विकासाचा बेत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भेट घेतलीये.. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या भेटीला महत्त्व आल्याचं बोललं जातंय.. मनसेने मुंबईच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केलीय, याबाबतच उद्योंगपतींचा कल जाणून घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जातंय.