शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

घाटकोपर दुर्घटना :  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

घाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.  

घाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर, मृतांची नावे पाहा

घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. इमारत ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडलाय. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. त्यामुळं दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.  

घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

घाटकोपरच्या चार मजली साई दर्शन इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झालाय. 

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांपूर्वी घर घेतलं, डोळ्यांसमोर कुटुंबासह संसार उध्वस्त

घाटकोपरमधल्या साईदर्शन इमारतीत ललित ठक यांनी तीन महिन्यांपूर्वी घर घेतले होते. मात्र घरासह संसारही आजच्या दुर्घटनेमुळे त्यांच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला. 

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता

घाटकोपर दुर्घटना : तीन महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह हाती, आई बेपत्ता

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तीन महिन्यांच्या बालिकेचाही मृतदेह सापडला. तर तिची आईदेखील बेपत्ता आहे. अजून ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  

घाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?

घाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?

घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे. 

अनधिकृत झोपडपट्टीनं घेतला सहा अल्पवयीन मुलांचा बळी

अनधिकृत झोपडपट्टीनं घेतला सहा अल्पवयीन मुलांचा बळी

मुंबईतल्या वांद्रेतील बेहरामपाड्यात चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच ते सहा जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भिवंडीतील हनुमान टेकडी भागात ही दुर्घटना घडली आहे.

भिवंडीत इमारत खचली, 9 जणांचा मृत्यू

भिवंडीत इमारत खचली, 9 जणांचा मृत्यू

भिवंडीतील गैबीनगरमध्ये एक दोनमजली इमारत खचलीये. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झालाय. 

कोल्हापुरात दोन मजली इमारत कोसळली

कोल्हापुरात दोन मजली इमारत कोसळली

कोल्हापुरातल्या सोन्यामारुती चौकात दोन मजली इमारती कोसळली. शेजारी सुरू असलेल्या बांधाकामाच्या खड्ड्यामुळे ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. 

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; १० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; १० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळलीय. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतीय.

नेपाळ भूकंप... रस्त्यावर इमारत ट्रॅक्टरवर कोसळली दोन जण बचावले

नेपाळ भूकंप... रस्त्यावर इमारत ट्रॅक्टरवर कोसळली दोन जण बचावले

नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाचे एक एक व्हिडिओ आता हाती येत आहे. भूकंप झाला त्यावेळी रस्त्यावर एक इमारत कोसळतांनाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

मुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार

मुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार

 मुंबईत कुलाब्याच्या गणेशमूर्तीनगरमध्ये झोपडपट्टीत एका घराच दुमजलीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळी एका घरावर छत कोसळून एक कामगार ठार तर पाच कामगार जखमी झालेत. जखमींना सेंट जॉर्जमध्ये हलवण्यात आलंय.

चेन्नईत 11 मजली इमारत कोसळली

चेन्नईत 11 मजली इमारत कोसळली

 चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.

दिल्लीत इमारत कोसळून 10 ठार

दिल्लीत इमारत कोसळून 10 ठार

उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरात आज सकाळी नऊच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुले आणि तीन महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

महिना उलटला; डॉकयार्ड दुर्घटनाग्रस्तांना दिलासा कधी?

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेला दोन महिने उलटले तरी मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई, निवारा किंवा नोकरी यापैंकी काहीही मिळालेलं नाही.

ठाण्यात पुन्हा कोसळली इमारत, जीवितहानी टळली

ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

इमारत दुर्घटना : ‘तो’ बारा तासानंतर सुखरूप...

डॉकयार्डमधली बाबू गेनू मंडई इमारतीमधून बारा तासानंतर एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. हा कुत्रा ढिगा-याखाली बारा तास होता. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी या कुत्र्याला बाहेर काढलं

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.