BBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर

BBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर

मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.

महिला स्वसंरक्षणासाठी हलक्या वजनाची रिव्हॉल्व्हर ‘निर्भिक‘!

भारतात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना सामोऱ्या येत असतानाच आता भारतीय दारूगोळा कारखान्यानं ०.३२ बोअरची हलकी निर्भिक ही वजनानं हलकी रिव्हॉल्व्हर तयार केली आहे. तिचा वापर महिला स्वसंरक्षणार्थ करू शकतील.

दिल्ली गँगरेप : देशभरातील प्रतिक्रिया

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’

दिल्ली गँगरेप : १६ डिसेंबरची रात्र आणि नंतर...!

१६ डिसेंबर २०१२ ची दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडितेसाठी रात्र जणू काळरात्रच होती... त्या घटनेनंतर जे काही घडलं त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...

दिल्ली गँगरेप : ‘त्या’ नराधमांना फाशी की जन्मठेप?

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्याचा निकाल आज दुपारी अडीच वाजता लागणार आहे.

बलात्काराच्या घटना होत राहतात – गृहमंत्री शिंदे

दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट आहे. लोक रस्त्यावर तर विरोधी खासदारांनी संसदेत आवाज उठवलाय. मात्र, असे असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संतापाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केलेय.

दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी

दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.

दिल्ली गँगरेप : आरोपीला हवाईदलाचा इंटरव्ह्यू कॉल

दिल्लीत डिसेंबर महिन्यात तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला भारतीय वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय.

बलात्कार पीडितेच्या नावाने नवी रेल्वे?

भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.

दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील

दिल्लीमध्ये झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंहच्या आत्महत्येला नवी कलाटणी मिळालीये. रामसिंगच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी आरोप केलाय.

दिल्ली गँगरेप : मुख्य आरोपीची जेलमध्ये आत्महत्या

दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने आज पहाटे पाच वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले.

अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’

दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.

का करायचं माफ ?

दिल्ली गॅंगरेपमधला सहावा आरोपी ठरला `अल्पवयीन` १८ वर्षाखालील आरोपीला गंभीर गुन्ह्यातही का मिळते माफी ? बालसुधारगृहात तरी सुधरतात का हे आरोपी ? वेळ आलीय का कायद्यात बदल करण्याची ?

अबू आझमींचं राज ठाकरेंना आव्हान

जालना येथे समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण करताना अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी युपी-बिहापी असल्याचा आरोप करणारे राज ठाकरे औरंगाबादमधील गँगरेप घटनेबाबत का मौन बाळगून गप्प आहेत? असा सवाल अबू आझमींनी केला.

दिल्ली गँगरेप पीडितेच्या यशानं पाणावले डोळे!

दिल्ली बलात्काराच्या घटनेनं सगळा देश ढवळून काढला. हा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. त्याचवेळी या दुर्दैवी तरुणीनं दिलेल्या शेवटच्या परीक्षेचे गुण समजले आणि तिच्या यशानं पुन्हा एकदा अनेकांचे डोळे पाणावलेत.

पुरूषांप्रमाणेच महिलांनाही वागणूक द्या - सुनीता विल्यम्स

भारतीय वंशाची अंतरळावीर सुनीता विल्यम्स हिने काल पुण्यातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

हातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना

अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.

`बलात्कार` कॉकटेल!

दिल्ली गँगरेप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत असतानाच मुंबईतली एक विचित्र घटना समोर आलीय. मुंबईतल्या बांद्रामध्ये एका पबमध्ये `बलात्कार` नावानं एक कॉकटेल मेन्यूकार्डमध्ये आपलं स्थन निश्चित करून आहे.

मी बलात्कारासाठी आहे तयार... -शर्लिन चोप्रा

दिल्लीतल्या गँगरेप घटनेविरोधात संपूर्ण देश धुमसू लागला असताना शर्लिन चोप्रा मात्र यातून स्वतःची पब्लिसिटी करू पाहात आहे. एकीकडे आंदोलनातून विरोधक फायदा करून घेत असल्याचा आरोप होत असताना शर्लिन चोप्राही स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वादग्रस्त ट्विट केलं आणि पुन्हा सर्वांना संताप आला.

NCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक

पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.

३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.