पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर वार केलाच...

पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर वार केलाच...

थकबाकीदार छोट्या शेतक-यांना अटक करता. मग मोठ्या धेंडांना पोलीस का अटक करत नाहीत? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. 

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे! जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

एक्सप्रेस-वेवरचे अपघात रोखणार कसे? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक एक्सप्रेस-वेवरचे अपघात रोखणार कसे? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातां संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. एक्स्प्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, १७ जणांचा बळी गेला. 

रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. 

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ? केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट

डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे. 

सर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार... सर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...

विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत... 

सर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी! सर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!

आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली. 

गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला

गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.

पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये -  मुख्यमंत्री पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये - मुख्यमंत्री

पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प झाली नाही पाहीजे अशी सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला केली आहे. आज राज्याच्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतला.

ठाकरे - मोदींच्या संवादानं मुख्यमंत्रीही अवाक् ठाकरे - मोदींच्या संवादानं मुख्यमंत्रीही अवाक्

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गेल्या रविवारी दूरध्वनी संवाद साधलाय. 'नीट'च्या विषयावर आपले मोदींशी बोलणं झाल्याची माहिती बैठकीत ठाकरेनी दिल्यावर मुख्यमंत्रीही अवाक् झाल्याचं समजतंय. 

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार' ''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की... जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रिकू राजगुरुला विचारलं की...

'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा बंगल्यावर 'सैराट'च्या टीमचं खास कौतूक केलं.

राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

मार्च २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मार्च २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

मार्च 2017 मध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिली. 

भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे भगवान महावीर हे जगातील सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. 

छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा वळण योजेनेचे रखडलेले काम तातडीनं सुरु करण्यासाठी भुजबळांनी हे पत्र लिहिलंय. 

ओबीसी क्रिमीलेअऱ मर्यादा वाढवणार ओबीसी क्रिमीलेअऱ मर्यादा वाढवणार

 ओबीसीची क्रिमीलेअर मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही : मुख्यमंत्री खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही : मुख्यमंत्री

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.