सुगंधी दूध की विष?

मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.