उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...

उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...

देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत.  ग्राहकांना ही उन्हात  तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 

मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फळविक्रेत्याला मारहाण

मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फळविक्रेत्याला मारहाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये राडा घातला. 

भाजपनंतर आता शिवसेनेचंही गुजराती प्रेम

भाजपनंतर आता शिवसेनेचंही गुजराती प्रेम

आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यासाठी घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.

मेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी

मेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 32 किमीच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत.

मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह

मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह

दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय. 

मुंबईत मेट्रो स्थानकात बेशुद्ध पडलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर : पोलीस

मुंबईत मेट्रो स्थानकात बेशुद्ध पडलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर : पोलीस

शहरातील घाटकोपर मेट्रो स्थानकात एक तरुणी बेशुद्ध पडली. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात ही  ही घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. 

विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार

विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार

घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत. 

मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

मुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप

मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.

२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार

२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार

घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर  भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.

व्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका

व्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका

व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे. 

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर परदेशी महिलेचा विनयभंग सीसीटी कॅमेऱ्यात कैद

दोन दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला होता. त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज झी मीडीयाच्या हाती लागलंय.

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला

मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.

वर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन

वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.

... आणि ती पुन्हा लिहू लागेल

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणारेत. जर्मनीवरून पंधरा दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे. मोनिका आणि तिचे कुटुंबिय सध्या आनंदात आहेत. कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणारेत.

मोनिका मोरेला बसवणार कृत्रिम हात

घाटकोपर रेल्वेस्टेशनवर अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला येत्या पंधरा दिवसांमध्ये कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मोनिकाच्या वैद्यकीय चाचण्या केईएममध्ये सुरू आहेत. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिका लिहू शकणार आहे, तसंच टायपिंगही करु शकणार आहे.

मोनिकाच्या मदतीसाठी... पालिकेचं एक पाऊल मागे!

राजकीय नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर कसा पडतो याचं ढळढळीत उदाहरण समोर आलंय. घाटकोपर रेल्वे अपघातात दोन हात गमावलेल्या मोनिका मोरेला मदत करुन तिचे अश्रू पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.

उत्तम डान्सर आणि सुंदर अक्षरं मोनिकाची होती ओळख...

घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावल्यानं तिला मोठा मानसिक धक्का बसलाय. सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

... आणि रेल्वेमुळं तिचं आयुष्य झालं उद्ध्वस्थ

घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीनं आपले दोन्ही हात गमावलेत. तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरूयत.

धक्कादायक: घाटकोपरमध्ये बलात्कार करुन महिलेची हत्या

नववर्षाचा पहिला दिवसच बलात्काराच्या घटनेनं हादरून गेलाय. मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम भागात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम करवल्यानंतर हे निदर्शनास आलंय की महिलेवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आली.