खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

सोन्याच्या वायदा भावात ४०५ रुपयांची घट, आता २९११० प्रति १० ग्रॅम सोन्याच्या वायदा भावात ४०५ रुपयांची घट, आता २९११० प्रति १० ग्रॅम

वैश्विक बाजारात कमकुवत ट्रेंडमुळे सट्टेबाजांनी आपले सौद्यात कपात केली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतीत ४०५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २९११० रुपये झाला आहे. 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ सोन्या-चांदीच्या दरात वाढ

ऐन लग्नसराईच्या मोसमात मागणी वाढल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. 

जानेवारीत सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता जानेवारीत सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने खरेदीचा विचार असेल तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने या महिन्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २४,७४०- २५-९१४ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

सोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात ४७० रुपयांची घसरण सोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात ४७० रुपयांची घसरण

सोने खरेदीला जाताय तर थोडे थांबा. कारण अजून स्वस्त होणार आहे सोने. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिन्यांच्या मागणीत घट राहिल्याने सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात ४७० रुपयांनी घट पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रति ग्रॅम २६ हजारांवरुन घसरुन २५ हजार ५३० वर बंद झाले. तसेच 

सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

 सोने आणखी स्वस्त होणार सोने आणखी स्वस्त होणार

सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे. 

सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...  सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय

परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.

सोने अखेर २५ हजार रूपयांच्याही खाली सोने अखेर २५ हजार रूपयांच्याही खाली

स्थानिक सराफा बाजारात सोनं सलग चौथ्या दिवशी घसरलं आहे, गुरूवारी सोने ४० रूपयांनी खाली आल्याने, अखेर सोने २५ हजाराच्या खाली आलं आहे, असं म्हणावं लागेल. कारण सोन्याचा भाव आता २४ हजार ९८० रूपयांवर आला आहे.

सोनं आलं एवढं खाली... सोनं आलं एवढं खाली...

जागतिक बाजारात सोन्याची आभूषण निर्मात्यांकडून तसेच किरकोळ मागणी घटल्याने, सोन्याचे भाव आणखी खाली येण्यास सुरूवात झाली आहे.

सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.

सोन्याच्या दरात आणखी घसरण सोन्याच्या दरात आणखी घसरण

सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे.  देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. 

सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले

परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.

पाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं पाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.

आयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट आयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट

सोनेच्या आयातीवरील नियंत्रणात सूट दिल्यानंतर सोन्याचे भावात सतत घट होत आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोने २६२०० रुपये कमी झाले. ही किंमत २५००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत काल सोने २६ हजार १५० रुपये होते ते आज २५ हजार ७३० पर्यंत खाली आहे. 

खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर! खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!

तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

वधुपित्यांना खुशखबर... सोनं  ६०० रुपयांनी स्वस्त वधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त

तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्‍या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.