आयपीएल स्पॉट फिक्सिंग - अजित चंडिलावर आजीवन बंदी

आयपीएल स्पॉट फिक्सिंग - अजित चंडिलावर आजीवन बंदी

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडीलावर आजीवन बंदी तर हिकेश शाहवर पाच वर्षांची बंदी लादण्यात आलीय. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय दिलाय.

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय.  इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय.. 

आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

श्रीनिवासन यांना `बीसीसीआय`चे दरवाजे खुले!

एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं त्यांना पुन्हा एकदगा अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी हिरवा कंदील दाखवलाय.

श्रीनिवासन खूर्चीपासून वंचितच! पुन्हा चौकशीचे कोर्टाचे आदेश

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार अजूनही स्वीकारता येणार नाही. सुप्रिम कोर्टानं बीसीसीआयला नवी चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं श्रीनिवासन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

स्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.

आयपीएल स्पॉटफिक्सिंग: आज आरोपपत्र दाखल?

आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आज मुंबई पोलीस आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. २१ जणांची नावं आरोपपत्रात असण्याची शक्यता आहे. यात १९ बुकींचा समावेश आहे.

अंकीत चव्हाण-श्रीशांतवर आजीवन बंदी

स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाणच्या क्रिकेट करिअरचा द एन्ड झाला आहे. आय़पीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे आता या दोघांना आयुष्यभर क्रिकेट खेळता येणार नाही.

IPL स्पॉट फिक्सिंग: चंडीलासह दोघांना जामीन मंजूर

आयपीएलच्या सहाव्या सिझनमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या क्रिकेटपटू अजित चंडीलासह दोघांना आज दिल्ली कोर्टानं जामीन मंजूर केला. शिवाय खटल्यातला काही भाग गहाळ असल्याचं कोर्टानं सांगितलं.

बीसीसीआयची चौकशी समितीच बोगस - हायकोर्ट

मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय

स्पॉट फिक्सिंग : द्रवीड होणार साक्षीदार

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्चा कॅप्टन आणि माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडल कोर्टात साक्षीदार म्हणून उभं करण्याचा निर्णय घेतलाय.

आपल्याचं टीमवर लावलेले पैसे हरल्याची कबुली

राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचाही सट्टेबाजीत सहभाग असल्याचं उघड झालंय.

अंकीत चव्हाण अडकणार लग्नाची बेडीत

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाण आज विवाहबंधनात अडकणार आहे. आपली मैत्रीण नेहा सांबरी हिच्याशी अंकित मुंबईत विवाहबद्ध होईल.

श्रीनिवासन यांचा ‘गेम ओव्हर’?

चेन्नईत होणा-या आज बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय... आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांनी काल राजीनामा दिल्यानं आता श्रीनिवासन यांच्यावर चांगलाच दबाव वाढलाय.

‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.

मयप्पन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ मेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.

सट्ट्यात २० लाख रूपये हरलो - मयप्पन

तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर बेटींग प्रकरणी गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आलीये सट्ट्यात २० लाख रूपये हरल्याची कबुली मयप्पननं दिलीय.

तीन तासांच्या चौकशीनंतर मयप्पनला अटक

स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.

मयप्पन आणि विंदूची समोरासमोर होणार चौकशी

मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन आज मुंबई पोलिसांसमोर दाखल झालेत.

फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रऊफ यांचे नाव समोर येत आहे. असद यांचा विंदू दारा सिंग यांच्या संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी असद रऊफ यांच्या विरोधात समन्स बजावला आहे.