जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये  बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

भारतीय लष्करानं दाखवली माणुसकी भारतीय लष्करानं दाखवली माणुसकी

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.

हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले

दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.

'काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान बलात्कार करतात' 'काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान बलात्कार करतात'

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने भारतीय जवानांबाबत धक्कादायक विधान करत नवा वाद निर्माण केलाय. यावेळी त्याच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे जवान आहेत. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा

अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय. 

जाट आंदोलन : शूट अॅट साईटची ऑर्डर जाट आंदोलन : शूट अॅट साईटची ऑर्डर

जाट आंदोलनात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू.

लष्करी श्वानपथकातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार लष्करी श्वानपथकातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार

आतापर्यंत भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या श्वानांना इंजेक्शन देऊन मारले जात असेल मात्र आता असे होणार नाही. आता लष्करी पथकातील श्वानही सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण जीवन जगू शकणार आहेत. या श्वानांनी संपूर्ण जगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिलाय. 

१९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान १९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान

१९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलीय.

भारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'? भारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'?

भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.

इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा

तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. 

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

अमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर अमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर

सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्‍यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत. 

व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा

भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 

म्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला म्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.

मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद

मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार

कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या तावडीत निर्घृण हत्या झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृत्यूचा आंतरराष्ट्रीय तपास करण्यास एनडीए सरकारनं नकार दिलाय. सरकारनं संसदेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय.

मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू

फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.  

बारामुल्लामध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत २ जवान शहीद बारामुल्लामध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत २ जवान शहीद

काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यात एक पोलीस आणि एक जवान शहीद झालाय. तर एक नागरिकही जखमी झालाय. 

पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

 पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.