भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली

भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली

लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

इंग्लंड विरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची आज घोषणा, २ खेळाडू चर्चेत

इंग्लंड विरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची आज घोषणा, २ खेळाडू चर्चेत

न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे. इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट. तीन वनडे आणि दो टी20 च्या सामन्यांसाठी येणार आहे. या सिरीजसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

धोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड

धोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड

भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 

इंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी

इंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी

टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 रन्सनी धूळ चारत व्हाईटवॉश दिला आहे. मॅचमध्ये 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी सपशेल शरणागती पत्करली. 

भारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान

भारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान

भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.

पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

पाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर

भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे. 

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

शिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म

भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड

शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड

बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे. 

२ वेळा लग्न करणार दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल

२ वेळा लग्न करणार दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल

टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक पुढील महिन्यात स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलसोबत विवाहबंधनात अडकरणार आहे. विशेष म्हणजे दे दोन खेळाडू दोन वेळा लग्न करणार आहेत. पहिल्यांदा १८ ऑगस्टला आणि दुसऱ्यांदा २० ऑगस्टला दोघांचा विवाह होईल.

एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह

एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह

क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधलाय. त्यांनी धोनीबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहेत. टीम इंडियामध्ये मुलगा युवराजला जागा न मिळाल्यानं योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीलाच दोषी ठरवलंय. 

रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

अश्विनला विश्रांती, कुलदीप यादवची टीम इंडियामध्ये एंट्री

अश्विनला विश्रांती, कुलदीप यादवची टीम इंडियामध्ये एंट्री

आठ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला स्थान देण्यात आलंय. 

विराट वन डेत नंबर, भारत तिसरा

भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वन डे रँकिंगमध्ये एक स्थानाने मागे पडली असून आता भारताचा तिसरा क्रमांक झाला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही फलंदाजांच्या यादीत क्रमांक १ वर कायम आहे.