कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कोकणवासियांचे परतीच्या प्रवासात होतायंत हाल

कोकणवासियांचे परतीच्या प्रवासात होतायंत हाल

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येनं ट्रेन उपलब्ध केल्यानं कोकणात जाणा-या भाविकांना प्रवास सुखाचा वाटला. पण आता परतीच्या प्रवासात या प्रवाशांना पुन्हा प्रभू आठवायला लागेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागतोय. रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या नियोजनशुन्यतेमुळे प्रवाशांवर ही वेळ आली आहे.

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

कोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे

कोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे

कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

विश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी

विश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय. 

कोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ

कोकणसह मुंबईत पाऊस मात्र, राज्यातील धरण क्षेत्राकडे पाठ

कोकण आणि मुंबईत पावसाने तळ ठोकला असला तरी राज्यातील धरणांच्या क्षेत्रात अद्यापही हवा तसा पाऊस सुरु झालेला नाही. त्यामुळे राज्यावरील पाणीटंचाईचं संकट अद्यापही कायमच आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

कोकणसह मुंबईत वादळी पावसाची शक्यता : कुलाबा वेधशाळा

कोकणसह मुंबईत वादळी पावसाची शक्यता : कुलाबा वेधशाळा

 कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय.

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

कोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी

कोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी

कोकणात गेल्यावर सध्या पिवळे धम्मक आंबे तुम्हाला नजरेस पडतील. ते हापूस नाही. तसेच ते देवगड हापूस नाही... अचंबित झालात ?  

शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव

शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव

कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास. शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी, तशी सांगताही अनोखीच असते. राजापूरजवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा पाहायला मिळते.

विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

कोकणाला नितीन गडकरींनी दिले भरभरुन, विकासाला चालना

कोकणाला नितीन गडकरींनी दिले भरभरुन, विकासाला चालना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या उपस्थित आज करण्यात आला. यावेळी कोकणाला देताना हात आखडता घेतला नाही.    

कोकणात आढळलाय शाम कदंब दुर्मिळ पक्षी

कोकणात आढळलाय शाम कदंब दुर्मिळ पक्षी

कोकणातील गुहागर समुद्र किना-यावर शाम कदंब हा दुर्मिळ प्रजातीचा पक्षी आढळलाय. वजनदार बांधा, लांब व जाड मान,  मोठं डोकं व चोच असलेला हा पक्षी युरोपमधून आल्याचं पक्षी अभ्यासकांचं म्हणणं आहे.