मराठा आरक्षणासाठी गोल्ड मॅनचे उपोषण

मराठा आरक्षणासाठी गोल्ड मॅनचे उपोषण

पुण्यात गोल्ड मॅनची क्रेज दिसून आली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजले हे गोल्ड मॅन म्हणून परिचीत होते. आता तर नाशिक येथे मराठा आरक्षणासाठी चक्क गोल्ड मॅन उपोषणाला बसलेले पाहायला मिळालेत.

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.

सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे

आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली. 

मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं  मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. 

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक

आज मुंबई उच्च न्यायालयानं एक  महत्त्वाचा निर्णय दिलाय. निवडणुका डोळ्यांसमोर असताना आघाडी सरकारनं घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय. 

अधिवेशनाचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणाचा?

मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टीक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या २८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, मेटे-फडणवीस यांची भेट

भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवरून मराठा आरक्षणावरून राजकीय वादळ उठण्यास सुरूवात झाली आहे.

मराठा आरक्षणाचा राग, एसटीच दिली पेटवून

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी एसटीला टार्गेट केले. आपला राग एसटीवर काढून गाडीच पेटवून दिली.

`जितेंद्र आव्हाडांनी शहाणपण शिकवू नये`

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आपल्याच पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोंडसूख घेतलंय.

भाजपाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

भाजपने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं तावडे म्हणाले.

आरक्षणावरून पवारांचं घूमजाव, मराठा संघटनांचा विरोध!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केलाय. मराठ्यांसह समाजातील सगळ्याच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. ती मान्य नसल्याचं सांगत मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मराठा संघटनांची मागणी आहे.

`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`

मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.

मुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज

मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध

मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

अजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आलाय - राज

जळगावात भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळीही राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी कमरेखालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यांचा राज ठाकरेंनी आज खरपूस समाचार घेतला.

आजच्या भाषणात काय म्हणाले राज?

आज जळगावात राज ठाकरेंनी कुठकुठले मुद्दे मांडले? काय म्हणाले राज ठाकरे?

मराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...

मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.

मराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र!

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळणारच, असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलंय.

...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांच्या मुदतीत निर्णय घ्यावा; अन्यथा राणे यांना राज्यभर नाकेबंदी करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणाचे कोल्हापूर, सोलापुरात पडसाद

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात २५ टक्के आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलयं. या आंदोलनाचे पडसाद कोल्हापूर आणि सोलापुरात उमटले.

मराठा आरक्षण लोकसभेत

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा पुढे आला आहे. आता थेट हा मुद्दा संसदेत गेला आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.