मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.

काँग्रेसच्या प्रिया दत्त उद्धव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेसच्या प्रिया दत्त उद्धव ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 

मुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे मुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.

मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी मातोश्रीत चाकू हल्ल्यात २ जण जखमी

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या मातोश्रीत झालेल्या चाकूहल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भांडण दोन नोकरांमध्ये झाली, यात भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेली एक महिला नोकरही जखमी झाली आहे.

Video :  बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे... Video : बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

... आणि राणे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून माघारी फिरले!	... आणि राणे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून माघारी फिरले!

त्या दोघांनी दहा वर्षांत एकमेकांची तोंडं पाहिली नाहीत... एकेकाळी दोघांमध्ये कितीही जिव्हाळा असला तरी कालांतरानं ते एकमेकांचे हाडवैरी झाले. आज तब्बल दहा वर्षांनी त्या दोघांच्या भेटीचा योग येणार होता... पण एका ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र मुकला... 

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा भाग म्हणून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजेच कलानगर भागात रॅली घेत शक्तीप्रदर्शन केलं. 

अपॉईंटमेंटशिवाय 'मातोश्री'वर नो एन्ट्री! अपॉईंटमेंटशिवाय 'मातोश्री'वर नो एन्ट्री!

अपॉईंटमेंटशिवाय भेटणार नाही, हे नवं धोरण आहे उद्धव ठाकरे यांचं... सत्ता समोर दिसताच शिवसेना नेत्यांच्या येरझाऱ्या वाढायला लागलेल्या दिसतायत. पण, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे नॉट रिचेबल झालेत. 

हिंदुत्त्वाच्या मुद्यावर सेना-भाजपनं एकत्र यावं- सुब्रह्मण्यम स्वामी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर सेना-भाजपनं एकत्र यावं- सुब्रह्मण्यम स्वामी

शिवसेना भाजप यांच्यात पुन्हा सत्तासहभागाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी आज मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र शिवसेना भाजप यांच्यात मध्यस्थी साठी आपण आलो नसल्याचं त्यांनी सांगितलंय. अर्थात हिंदूत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये अशीच आपली इच्छा असल्याचं ते म्हणाले.

अनंत गितेंची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी निवड

राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मातोश्रीवर चांगलीच लगबग होती. हा विजय साजरा करण्यासाठी मातोश्री सजली. सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती.

मातोश्रीवर मुंडे, तावडेंशी उद्धव ठाकरेंची बैठक

उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांची मातोश्रीवर चर्चा सुरू आहे.

चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल

आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

आठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवाळी गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय. आपल्या राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आठवलेंनी या भेटीनंतर दिली.

अखेर सरांनी घेतलं नमतं, पोहोचले ‘मातोश्री’वर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आज ‘मातोश्री’वर गेले होते. तिथं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्य़ाआधी जोशी यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं जोशी सरांनी भेटीनंतर स्पष्ट केलं. मात्र, ही भेट तब्बल तासभर चालल्यानं तर्कवितर्कांना वेग आला आहे.

ठाकरे परिवाराच्या सांत्वनासाठी `मोदी मातोश्रीवर`

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केलं. सध्या नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारात व्यस्त आहे.

'मातोश्री`वरील घडामोडी

आज दिवसभर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या `मातोश्री` बंगल्याकडे.. भावूक शिवसैनिकांची गर्दी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असंच याचं स्वरुप होतं.

बाळासाहेबांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रांतील दिग्गज `मातोश्री`वर

आज सकाळपासूनच ‘मातोश्री’वर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींचा बाळासाहेबांच्या भेटीसाठी ओघ सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत.

बच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा

अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”

मातोश्रीहून राज ठाकरे निघाले, प्रकृती अजूनही गंभीर

राज ठाकरे मातोश्रीवरुन थोड्याच वेळापूर्वी निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. आज सकाळपासून शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी वाढते आहे.

राज ठाकरे मातोश्रीवर, बाळासाहेबांची घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी दुपारी मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांची भेट घेण्यासाठी राज आले होते.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.