मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर  महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. 

भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले!

भाजपच्या माघारीने गीता गवळी, मनसेचे महत्व झाकोळले!

 शिवसेनेचा आता महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अभासे आणि मनसेला आलेले महत्व कमी झालेय.

भाजप मुंबई पालिकेवर आपला अंकुश ठेवणार?

भाजप मुंबई पालिकेवर आपला अंकुश ठेवणार?

महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी आपला अंकुश ठेवण्यासाठी व्युहरचना केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी आयुक्तांसह एक स्वतंत्र उपलोकायुक्ताची नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

गडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र!

गडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र!

महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

मुंबई पालिकेत कसे जमणार सत्ता समीकरण?

मुंबई पालिकेत कसे जमणार सत्ता समीकरण?

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागला. पण भाजप-शिवसेनेतलं महाभारत अजून संपलेले नाही.  

भाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी

भाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी

भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे. 

मुंबईत या ठिकाणी बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी

मुंबईत या ठिकाणी बंडखोरीमुळे शिवसेनेची डोकेदुखी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय. 

शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री

शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केलेय. 

मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव

मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव

मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतला. मानखुर्द परिसरातील एका खड्ड्या बुडून दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हायड्रोलिक डिपार्टमेंटनं पंधरा दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला. 

शरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू!

शरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल, मुंबईचा विकास आम्ही करुन दाखवू!

 महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी प्रचाराने आजपासून रंगू लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मानखुर्दपासून सुरु झाला. यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्याचवेळी शिवसेनेला टार्गेट केले. या दोघांची पालिकेत सत्ता आहे. मात्र, मुंबईकरांच्या समस्या कायम आहे. त्यांना दूर करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. 

मुंबई पालिकेत तब्बल ५० कोटींचा टॅब घोटाळा, उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई पालिकेत तब्बल ५० कोटींचा टॅब घोटाळा, उच्च न्यायालयाने फटकारले

महापालिकेतल्या टॅब घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका अधिका-यांना फटकारले. चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. विद्यार्थ्यांना दिलेले 10 हजार टॅब बंदच असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चौकशीत पुढे काय येते याकडे लक्ष लागले आहे.

कॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ

कॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ

कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 हेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा

हेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा

महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे. 

भाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री

भाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री

भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. 

भाजप-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप, करुन दाखलं म्हणारे जेलमध्ये जाणार : भाजप

भाजप-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप, करुन दाखलं म्हणारे जेलमध्ये जाणार : भाजप

मुंबईच्या रस्ते घोटाळ्यावरून शिवसेना भाजपवरून आरोप प्रत्यारोप सुरु झालाय. करून दाखवणारेही आता जेलमध्ये जातील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलारांचा यांनी शिवसेनेला लगावलाय. दरम्यान, आम्हीच हे प्रकरण उजेडात आणलं, असा दावा शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलाय.

मुंबईतील फुटपाथवरील हॉटेलवर कारवाई

मुंबईतील फुटपाथवरील हॉटेलवर कारवाई

थेट फूटपाथवर अतिक्रमण करून बिनधास्त हॉटेल थाटलेल्या वोक हाई या लोअर परेल परिसरातील हॉटेलवर मुंबई महापालिकानं आज कारवाई केली. 

मुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार

मुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार

महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.