मुंबई मनपात पैशांना फुटले पाय!

मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय...

मुंबई मनपाच्या ३८ शाळांना मुख्याध्यापकच नाही!

मुंबई महानगरपालिकांच्या 38 शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या 3 वर्षापासून शाळांमधिल शिक्षकांची पदं देखिल रिक्त आहेत.

महापालिकेत काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेविका भिडल्या

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्यावरून महापालिकेत खडाजंगी झालीय. सत्ताधारी शिवसेना-भाजपनं रेसकोर्सच्या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर केल्यामुळं विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध

फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.

सुगंधी दूध की विष?

मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.

मुंबई मनपाच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार

मुंबई महापालिकेच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार झालाय. जिमखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू, जिमखाना जागेत उभी असणारी जाहीरात होर्डींग्ज यामध्ये तर गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंच आहे.