काँग्रेसची अजित सावंतांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई प्रदेश सरचिटणीस अजित सावंत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित सावंत यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.

मुंबई पालिकेसाठी भाजपाची दुसरी यादी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान नगरसेवक भालचंद्र शिरसाट वगळता नवीन चेहऱ्यांना पक्षाने पसंतीक्रम दिला आहे.

उदंड जाहले बंडखोर, सेनेच्या जीवाला घोर

माटुंगा, वडाळा, दादर पाठोपाठ आता घाटकोपरच्या भटवाडी प्रभागात देखील शिवसेने समोर बंडखोरीचे आव्हान उभं ठाकलं आहे. सई शिर्के यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नगरसेवक राजा चौगुलेंनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचे आव्हान

शिवसेनेत पुन्हा बंडखोरी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दादरमधल्या १८५ प्रभागाची उमेदवारी प्रविण शेट्ये यांना दिल्याने संजय भरणकर आणि भरत राऊत या माजी शाखा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.

महायुतीची घोषणा अन् आठवलेंची चौफेर फटकेबाजी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.

आघाडी संदर्भात निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

मुंबई मनपातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढल्यानं मुख्यमंत्र्यांना अखेर दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीनं आज संध्याकाळचा अल्टिमेटम दिल्यामुळं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी अखेर दिल्लीला रवाना झाले आहेत.

मुंबईत आरपीआयला 25 ते 30 जागा ?

झी 24 तास वेब टीम, मुंबई