<B> <font color=red> एक्सक्लुझिव्ह : </font></b> ... अशी होते भारतात घुसखोरी!

‘झी मीडिया’नं पाकिस्तानच्या सीमेवरची घुसखोरी दाखवणारा प्रकार उघड केलाय. दिवसा तारांना रबर बांधायचं आणि रात्री घुसखोरी करायची, हा पाकचा कूटनीतीचा डाव आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

पाककडून गोळीबार सुरूच, एक जवान शहीद तर ६ जखमी

पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) आरएस पुरा सेक्टरमधील भारतीय सैन्यांच्या चौकीवर पुन्हा गोळीबार केलाय. या गोळाबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला असून सहा जवान जखमी झाले आहेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

पाकिस्तानात भूकंपानं हाहाकार; मृतांचा आकडा २०० वर

पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या ८० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ८० जण जखमी झालेत.

पाकच्या नापाक कारवाया सुरुच

पाकच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाक सैन्याकडून रात्रीपासून पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे.

भारतीय सैन्यात घुसखोरी

सैन्यात हनीट्रॅप करत होत असलेली हेरगिरी.. भारतीय सैन्यातील एक लेफ्टनन कर्नल एका बांग्लादेशी सौंदर्यवतीच्या जाळ्यात साप़डला आणि त्यावर रॉने कारवाई केलीय.. पण हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीय तर त्या कर्नलचा लॅपटॉपही गहाळ झाला.. आणि त्या लॅपटॉपमध्ये होती सुरक्षेविषयी अतिशय महत्वाची माहीती.. या हेरगिरीचा पर्दाफाश.. भारतीय सैन्यात घुसखोरी.

काश्मीरमध्ये घुसला पाकचा सैनिक

पाकिस्तानची घुसखोरी कायम आहे. पाकमधून अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर यावर पाकने कडी केली आहे. चक्क पाकिस्तानचा एक सैनिक भारतातच घुसला. तो कसा आला आणि का आला याची माहिती मात्र, देण्यात आलेली नाही. लष्कराच्या जवानांना या पाकिस्तानच्या सैन्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.