नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार, डॉ. जोशी, विराट कोहलीचा पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनादेखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

व्हिडिओ : नोटाबंदीचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील -राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

व्हिडिओ : नोटाबंदीचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील -राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. 

डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम बसेल : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम बसेल : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणाम चांगला असेल. तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली. 

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.  

देशातील सहिष्णुतेबाबत  राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

देशातील सहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.

व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.

लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही

भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.

संयमाचा अंत पाहू नका, पाकला राष्ट्रपतींचा इशारा

पाकिस्तानकडून भारताला त्रास देने सुरू आहे. सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात दम भरला आहे. संयमालाही काही मर्यादा असतात. आमच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

पाकनं भारताचा मैत्रीचा हात गृहीत धरू नये - राष्ट्रपती

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी पाकिस्तानला स्पष्टपणे समज दिलीय. भारत पाकिस्तानबरोबर मैत्रीसाठी एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे पण, पाकिस्ताननं मात्र याला भारताचा दुबळेपणा समजू नये, असं म्हणत राष्ट्रपती मुखर्जी यांनी भारताला गृहीत न धरण्याची समज पाकला दिलीय.

शिवसेना आणि भुजबळांचं एकमत

बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.

भ्रष्‍टाचाराने देश पोखरलाय - राष्ट्रपती मुखर्जी

www.24taas.com, नवी दिल्ली

देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ती काढून टाकली पाहिजे. यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा, असे नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला दिलेल्या अभिभाषणात सांगितले.

भ्रष्‍टाचाराने देशाला पोखरले आहे. त्यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. भ्रष्टाचारासह दहशतवाद, गरीबी आणि जनतेच्या आरोग्य विषयक समस्येला प्राधान्य देऊन त्या आधी सोडविल्या पाहिजेत, असे राष्ट्रपती म्हणालेत.

भ्रष्टाचार देशाच्या प्रगतीला मारक ठरत आहे. त्यातच भ्रष्टाचाराविरोधात जनतेच्या भडकलेल्या भावनांचा मी आदर करतो, मात्र त्यावर प्रभावीपणे अंकुश ठेवला जात नसल्याचे मुखर्जींनी मान्य केले.

देशातील शासकीय संस्था भारतीय संविधानाचे मजबूत स्तंभ आहे. त्या उद्‍वस्त करता येणार नाही. परंतु, त्यात सुधारणा करता येऊ शकतात, असेही मुखर्जींनी म्हटले. त्यामुळे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांना अप्रत्यक्ष राष्ट्रपतींनी टोला लगावला.

जनतेने न्यायप्रक्रीयेवर विश्वास ठेवला पाहिजे. जनतेला राज व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कायदा तयार करण्याचा अधिकार संविधानाला आहे. आणि त्याला न्याय देण्याचा अधिकार न्याय प्रक्रियेला आहे. आपण हा अधिकार न्याय संस्थांकडून हिरावून घेऊ शकत नाही, असेही अण्णा आणि बाबांना सुनावताना सांगितले की, जर अधिकारी हुकूमशाहा बनले तर मात्र लोकशाहीचे मोठे नुकसान होत असते. शालिनता आणि सहिष्णुता लोकशाहीचा मूळ आधार आहे.