राष्ट्रवादीने मदत करुनही बाबा विसरले - अजित पवार

राष्ट्रवादीने मदत करुनही बाबा विसरले - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करुनही बाबा विसरले अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केलीये.

भाजपच्या फायद्यासाठी माझे सरकार राष्ट्रवादीने पाडले : पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या फायद्यासाठी माझे सरकार राष्ट्रवादीने पाडले : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. रोखठोक कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावलेत. त्याचवेळी भाजपच्या फायद्यासाठी काँग्रेस सरकार पाडल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेतून बाहेर' 'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेतून बाहेर'

शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये रोज काही ना काही प्रकरणावरून वाद सुरु आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांची विनोद तावडेेच्या राजीनाम्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांची विनोद तावडेेच्या राजीनाम्याची मागणी

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण

कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र  हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 

'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस' 'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

भाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण भाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री! आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!

देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

पृथ्वीराज चव्हाण अडकले लिफ्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण अडकले लिफ्टमध्ये

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चक्क लिफ्टमध्ये अडकले. चव्हाण काल संध्याकाळी चर्चगेट येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. अग्निशमन दलाने लिफ्टमधून त्यांची सुटका केली.

निकालापूर्वीच पृथ्वीबाबांविरोधात नाराजीचा सूर, घमासान सुरू! निकालापूर्वीच पृथ्वीबाबांविरोधात नाराजीचा सूर, घमासान सुरू!

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरू झालंय. पृथ्वीराज काँग्रेसमध्ये 'हिटलिस्ट'वर असतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेलं विधान त्यांच्या पक्षातील विरोधकांसाठी आयतंच कोलीत देणारं ठरलंय.  

ती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी ती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी

आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. 

काँग्रेसबाबत 'ते' विधान अनवधानाने - पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसबाबत 'ते' विधान अनवधानाने - पृथ्वीराज चव्हाण

अनौपचारिक गप्पांमध्ये अनवधानाने केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी आता केला आहे.

आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी आदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी

आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. 

चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केलीय. मोदींना सर्व राज्यांचाही रिमोट कंट्रोल आपल्या हाती हवाय.  

ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला

कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. 

नितीन गडकरींची आता  बुद्धीही भ्रष्ट - पृथ्वीराज चव्हाण नितीन गडकरींची आता बुद्धीही भ्रष्ट - पृथ्वीराज चव्हाण

 आतापर्यंत नितीन गडकरी भ्रष्टाचारी आहेत, असं वाटत होतं, मात्र आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचंही लक्षात येतंय, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागलीये. 

पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी! पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' जाहिरातीवर बंदी!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे कराड मतदारसंघाचे उमेदवार सध्या चर्चेत आहेत ते विविध वाहिन्यांवर झळकणाऱ्या एका जाहीरातीमुळे... याच जाहिरातचं प्रसारण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात! काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!

महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 

पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसची भिस्त

 यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... 15 वर्षांचं आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि काँग्रेसमधील विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... यंदा जाहिरातीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केलेला दिसतो आहे. काँग्रेसला जे काही यश मिळेल ते पृथ्वीबाबांच्या इमेजमुळेच.... 

पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती  - शरद पवार पृथ्वीराजांची 'तशी' मानसिकताच नव्हती - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी तुटल्याचं खापर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यावर फोडलंय. ते पुण्यात बोलत होते.