'बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा'

'बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय.  बाळासाहेब नसल्याने  शिवसेना हवा नसलेला गोळा, अशी बोचरी टीका केली.

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

राम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर

राम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्यावतीने नगरसेवक दिलीप लांडे हे राम कदम यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभाग अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर घाटकोपर पश्चिममधली जनता आपल्यालाच निवडून देईल, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केलाय. 

मनसेचा राम भाजपमध्ये दाखल

मनसेचा राम भाजपमध्ये दाखल

 विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.

राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश

राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

मनसेचे आमदार राम कदम फरार

महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मनसे आमदार राम कदमांवर अॅट्रॉसिटी

घाटकोपर मतदारसंघाचे मनसेचे आमदार राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे आमदार राम कदम यांनी हे कायं केलं ?

निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.

आमदार राम कदम, क्षितिज ठाकूरांवर आरोपपत्र

वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.

राम कदम यांना अटक

मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांना पोलिसांनी अटक केलीय. रेशनिंग ऑफिसर महेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय.

‘पापक्षालना’साठी राम कदम चालले काशीला?

गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राम कदम आता काशी यात्रेला गेले आहेत.

पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.

राम कदम नारायण राणेंच्या भेटीला!

मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वांद्रे इथल्या मना-स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले

निलंबित आमदार राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस दलाने घेतला.

कदम-ठाकूर सहिसलामत सुटणार?

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट रेकॉर्डिंग झालंच नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांला मारहाण करणाऱ्या या आमदारांना संशयाचा फायदा मिळू शकतो.

आमदार राम कदम पुन्हा अडचणीत!

मनसेचे आमदार राम कदम हे पुन्हा अडचणीत आले आहेत. मुंबईतल्या पंतनगरमधल्या रेशन दुकान मालकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय.

पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

सचिन सूर्यवंशींना अटक कधी?

राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.

आमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.

मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन

पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.

खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!

राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.