छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं, रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली.

पुण्यात रोडरोमियोचा मुलीच्या घरावर हल्ला

पुण्यात रोडरोमियोचा मुलीच्या घरावर हल्ला

शाळकरी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून रोडरोमियोनं मुलीच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय तिच्या घरापुढील गाडयांचीही तोडफोड केली आहे. यामुळं परिसरातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मंगळवारपेठेत राहणा-या आशिष डांगे हा रोडरोमियो गांधी विकासनगरमधल्या मुलीची वारंवार छेड काढायचा. रस्त्यात अडवून तिला धमकवायचा. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीनं याबाबत पालकांना सांगितलं. तिच्या पालकांनी याबाबत जाब विचारल्याचा आशिष डांगेला राग आला. त्यानंतर त्यांनं मित्रांना बोलावून मुलीच्या घराजवळच्या गाड्यांची तोडफोड केली.

रोड रोमियो गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

रोड रोमियो गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

रोड रोमियो आणि गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून एका शाळकरी मुलीनं आत्महत्या केली. 

औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

औरंगाबाद शहरात एका अल्पवयीन मुलीनं रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय. शहरातील बालाजी नगरमध्ये राहणारी सतरा वर्षीय युवती बारावीत शिकत होती. 

रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका महिलेने रोड रोमिओला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. मोबाईल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. 

रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`...

`व्हेलेटाईन डे`च्या दिवशी एका रोडरोमिओला चांगलंच गिफ्ट मिळालंय. मुलींची छेड काढणाऱ्या या रोड रोमिओला जमावानं चांगलाच चोप दिलाय.

रोड रोमियोंना `लेडी सिंघम`चाप!

रुपेरी पडद्यावरचा ‘सिंघम’ तुम्ही बघीतला असेल. पण वास्तवातही असेही काही पोलीस अधिकारी असल्याचं बुधवारी कोल्हापूरकरांना पहायला मिळालं.

रोडरोमियोंना कंटाळून तरुणीची आत्महत्या

नाशिकमधून संतापजनक बातमी..... शहरात खुलेआम रोडरोमियो महिलांची छेड काढतायत. सातपूर भागातल्या एका तरुणीनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय.

रोड रोमिओ: आमदारांनी धरले, पोलिसांनी सोडले

रोड रोमिओंना पकडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बापू पठारे यांनी त्यांना या विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात रोड रोमिओंना दिल्यानंतर आमदारांचे काम संपले आणि पोलिसांचे सुरु झाले.

रोडरोमिओंच्या मुकाबल्यासाठी रणरागिणी सज्ज

पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.

दहशत रोड रोमियोंची

डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.

रोडरोमिओचा हल्ला

पत्नीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला ध़डा शिकविण्यासाठी गेलेल्या बिपीन यांना आरोपीने मारहाण करत त्यांचा बोटाला चावा घेतला आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंच्या या कृत्यामुळं नागरिकांध्ये दहशत पसरलीय.