रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.