राज 'गडी बावचळलायं' - अजित पवार

नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.

राम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक

अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.

मनसे-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दग़डफेक केल्याची पोलिसांत नोंद करण्यात आलीये.

पालिकेतील अजितदादांच्या फोटोला काळे फासले

अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला.

दगडफेक ही मनसेची स्टंटबाजी – नवाब मलिक

अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

मुंबईत मनसेने केलीत NCPची कार्यालये टार्गेट

अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...

मनसेनेच गाडीतून आणले होते दगड- राष्ट्रवादी

मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्याचा आरोपही काळे यांनी केलाय...

राज ठाकरेंवरील हल्ल्यामुळे राज्यभऱात ‘खळ्ळ् खट्याक’!

अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात झालीय...