sachin suryavanshi marhan episode

आमदार राम कदम, क्षितिज ठाकूरांवर आरोपपत्र

वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या आवारात मारहाण केल्याप्रकरणी मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरूद्ध येत्या ३0 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसे राज्यशासनाने स्पष्ट केलेय.

Jun 13, 2013, 11:32 AM IST

पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.

Apr 17, 2013, 01:32 PM IST

पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.

Mar 25, 2013, 04:37 PM IST

सचिन सूर्यवंशींना अटक कधी?

राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.

Mar 25, 2013, 02:38 PM IST

आमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.

Mar 25, 2013, 12:43 PM IST

मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन

पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.

Mar 25, 2013, 12:33 PM IST