ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले

राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेची तोडफोड

नगरविकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नारायण राणे यांचे समर्थक म्हणून समजले जाणारे संदीप सावंत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 

शिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण शिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण

राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले. 

पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवा : शिवसेना पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवा : शिवसेना

शिवसेनेने पाकिस्तानच्या राजदूताला २४ तासात परत पाठवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. काश्‍मीरबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करणारे पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बसीत यांना २४ तासात पाकिस्तानमध्ये परत पाठवावे, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

'अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल' 'अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल'

विधानसभेत अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशा इशारा सेनेने दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.

MIMची मान्यता रद्द करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी MIMची मान्यता रद्द करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी

शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी MIMची मान्यता रद्द करावी मागणी केली. MIMचेनेते ISISशी संबंधित तरुणांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज

सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

शिवसेनेला गृहराज्य मंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदल शिवसेनेला गृहराज्य मंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदल

राज्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ करण्यात येणार असून शिवसेनेला एक गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदलही करण्यात येणार आहे.

गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद? गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?

जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे.

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 

शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे. 

 मुंबईत भाजपचा नारा... स्वबळावर खेळ मांडणार... मुंबईत भाजपचा नारा... स्वबळावर खेळ मांडणार...

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापु लागलं आहे. नेहमी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपात आता मुंबईत फूट पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणूकीत भाजपने नावा नारा दिला असून ११४ प्लस जागा मिळविणार असल्याचे म्हटले आहे. 

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ भाजपचा : शिवसेना मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ भाजपचा : शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा एनडीएचा विस्तार नसून फक्त भाजपचा विस्तार असल्याची तिखट प्रतिक्रिया आज शिवसेनेने दिली आहे.

केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज

केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज आहे. त्यामुळे शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.

भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्याचे प्रयत्न, मुनगंटीवार मातोश्रीवर भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्याचे प्रयत्न, मुनगंटीवार मातोश्रीवर

भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्यासाठी आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ

भारत-पाक संबंधांचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पुन्हा धुडगूस घातला. कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार

येथील महागाव इथे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही शिवसेनेच्या गुंडांकडून झाल्याचा घणाघाती आरोप आमदारांनी केला आहे.

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर भाजप बॅकफूटवर, सारवासारवची भाषा शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर भाजप बॅकफूटवर, सारवासारवची भाषा

शिवसेना-भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. भाजप नेते माधव भांडारींच्या मनोगताने शिवसेनेचा जळफळाट झाला. हवं तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवा, असा थेट इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर आली.