ठाण्यात रिक्षा चालकांच्या संपात फूट, रिक्षा रस्त्यावर

ठाण्यात रिक्षा चालकांच्या संपात फूट, रिक्षा रस्त्यावर

शिवसेना आणि भाजपच्या रिक्षा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.  त्यामुळे सेना, भाजपच्या रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक सकाळपासून रस्त्यावर आहेत.

कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'

कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'

 'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द  उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती. 

'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण

'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण

गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत. 

भिवंडीत अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा भांडाफोड, १७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीत अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा भांडाफोड, १७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीतील अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.  

चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

दुरुस्तीनंतर चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ठाण्यातील जुना वर्सोवा पूल काही कामानिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

राज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद

राज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद

राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.

वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद

वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद

बातमी जुन्या वर्सोवा पूलासंदर्भात.अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे. 

ठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!

ठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!

ठाणे पालिका आयुक्तांनी  काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत. 

...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!

...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!

ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली. 

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू

 पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे. 

ठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात

ठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात

महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक  करण्यात आलीय. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्य्यात आलंय. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार

अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार

 प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते. 

घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट

घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट

घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.

13 वर्षांच्या विद्यार्थ्याची कमाल, बनविले स्वयंचलित पाणीपुरवठा करणारे यंत्र

13 वर्षांच्या विद्यार्थ्याची कमाल, बनविले स्वयंचलित पाणीपुरवठा करणारे यंत्र

जलसंकट दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रकल्पांचा फेरविचार सुरु असतानाच ठाण्याच्या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या अवघ्या १३ वर्षाच्या मानस महेश गर्गे या विद्यार्थ्याने मात्र पाण्याची नासाडी न करता स्वयंचलित पाणीपुरवठा करणारे यंत्र तयार केले आहे. 

ठाण्याची झणझणीत मामलेदार मिसळ

ठाण्याची झणझणीत मामलेदार मिसळ

मिसळ हा शब्द ठाणेकरांच्या कानावर आला की, ते लगेच म्हणतात अरे मामलेदारची मिसळ छान आहे हं, एकदा खाऊन पाहा.

बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा, मुंबई विमातळावर आरोपीला अटक

बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा, मुंबई विमातळावर आरोपीला अटक

बोगस कॉल सेंटर प्रकारणातील मुख्य आरोपी  सागर तथा शेगी ठक्कर याला ठाणे गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे 

अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका, ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री नष्ट

अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका, ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री नष्ट

कल्याण रेतीबंदर परिसरात बुधवारी दुपारनंतर ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका दिला. 

'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल

'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल

शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.

हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन

हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन

ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा

महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.

ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.