संघर्षाला हवी साथ संघर्षाला हवी साथ

झी 24 तास ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी बातम्यांबरोबरच सामाजिक भानही जपत आली आहे. याच सामाजिक जाणिवेतून गेल्यावर्षीपासून आम्ही दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवान पण गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘संघर्षाला हवी साथ’ हा उपक्रम राबवत आहोत. केवळ गरीब आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाया जाऊ नये आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. यावर्षी आम्ही अशाच २० मुलांसाठी मदतीचं आवाहन सर्व प्रेक्षकांना करीत आहोत. यापैकी काही मुलांना तरी आपण मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे. आपल्याला ज्या मुलांना मदत द्यायची आहे अशा मुलांच्या नावे धनादेश द्यावा ही विनंती.