अफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.

तालिबानमध्ये मुलींना विष देऊन मारले

तालिबाननं आत्तापर्यंत एक हजार शाळकरी मुलींना विष देऊन मारल्याचं सांगण्यात येतंय. तर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवून एका महिलेला क्रूरपणे मारलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

तालिबानी कहर

लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..