जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह  गोठवले

जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.

शशिकला यांना 100 कोटींचा दंडही, तुरूंगात धाडण्याची प्रक्रिया सुरू

शशिकला यांना 100 कोटींचा दंडही, तुरूंगात धाडण्याची प्रक्रिया सुरू

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी शशिकला यांना चार वर्ष तुरुंगवास आणि 100 कोटींच्या दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. 

शशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी

शशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी

ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.

तामिळनाडूचा मुख्यमंत्री बदलणार ? आमदारांची आज बैठक

तामिळनाडूचा मुख्यमंत्री बदलणार ? आमदारांची आज बैठक

एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी AIADMK पक्षाच्या आमदारांची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक होतेय. पक्षाच्या महासचिव शशिकला यांना मुख्यमंत्री होण्याची गळ बहुतांश आमदार घालतील, अशी शक्यता आहे.

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

शशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता

जयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता

तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

शशिकला यांची अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड

शशिकला यांची अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. 

शशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप

शशिकलांच्या पतीला AIADMK कार्यकर्त्यांनी दिला चोप

एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.

जयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?

जयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.

म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं

म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं

७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

जयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास

जयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास

फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.

जयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध

जयललिता यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमकेचा विरोध

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे. 

राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

राज्यसभेत घुमला थप्पडीचा आवाज

एआयडीएमकेच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी तीन दिवसांपूर्वी  डीएमके खासदार तिरुची शिवा यांना दिल्ली विमानतळावर थप्पड मारल्याचा आरोप आहे.

तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

जयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?

जयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?

जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं. 

पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त

पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.

आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना याबाबत लवकरच शिक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे.

मोदींचा ‘लुंगी डान्स’, अम्मा एनडीएत येणार?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जयललिता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

जयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी?

आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.