नाठाळांचे माथी हाणू काठी

लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी धक्काबुक्कीच्या विरोधात ‘झी मीडिया’नं कुठल्याही दबावाला न झुकता वाचा फोडली आणि अनेकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. देवाला हाताशी धरून देवाचं मार्केटिंग करून कोट्यवधी रूपये भक्तांकडून मिळवून त्यांनाच दाबून मारण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, हे ‘झी २४ तास’नं ठणकावलं. सातत्यानं बातम्या दाखवल्यानंतर अखेर गृहमंत्री जागे झाले आणि कारवाईच आश्वासन दिलं. अर्थात कारवाई काय होते याकडेही आमचं लक्ष असणार आहेच.

लसलसणारी पुरुषी लांडगेवृत्ती....

‘लगता है छिनाल है साली’.... लोकलच्या पहिल्या वर्गाच्या महिला डब्यात शिरलेली फाटक्या कपड्यातली स्टेशन परिसरात फिरणारी पाच सहा छोटी–छोटी मुलं त्याच डब्यात बसलेल्या माझ्या एका मैत्रिणीकडे बराच वेळ बघत मानखूर्द स्टेशनला उतरली.