anna hajare

राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करा- अण्णा हजारे

राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करा- अण्णा हजारे

 सर्व राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. 

Oct 3, 2017, 08:53 PM IST
अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकआंदोलनाच्या रेट्यानंतर संसदेत कायदा मंजूर होऊनही लोकपाल आणि लोकायुक्त देशात कुठेही नियुक्त होणार नसतील, तर ही जनतेच्या भावनांशी सरकारनं केलेली प्रतारणा असल्याचा आरोप, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केलाय.

Mar 29, 2017, 04:29 PM IST
अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे काही सहकारी तुरुंगात जातायत, तर काही घोटाळ्यांमध्ये अडकतायत, हे पाहून दुःख होत असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.

Sep 6, 2016, 11:33 AM IST
अवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर

अवयवदानासाठी अण्णा, शिवशाहीर पुरंदरे, मृणाल कुलकर्णी रस्त्यावर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिकांनी आज पुण्यामध्ये अवयवदानाचा अर्ज भरला. 

Aug 30, 2016, 06:23 PM IST
कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद, अण्णा हजारेंनी केला निषेध

कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद, अण्णा हजारेंनी केला निषेध

कोपर्डीच्या प्रकरणाचे ठिकठिकाणी पडसाद उमटले. लातूरमध्ये सर्वपक्षीय संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बंदला हिंसक वळणही लागलं. लातूर तालुक्यातल्या भोई समुद्रगा इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिली. ज्यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. 

Jul 19, 2016, 08:35 PM IST
राजकीय धुरंदराने अण्णा हजारेंसोबत काय केली चर्चा

राजकीय धुरंदराने अण्णा हजारेंसोबत काय केली चर्चा

राजकीय धुरंदर म्हणा किंवा छोटा पुढारी. सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या घनश्याम धनवडे यानी काही दिवसांपू्र्वी अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. 

Feb 1, 2016, 07:59 PM IST
चिमुकल्या 'राजकीय धुरंधरा'नं घेतली अण्णांची भेट

चिमुकल्या 'राजकीय धुरंधरा'नं घेतली अण्णांची भेट

श्रीगोंदा तालुक्यातील लहानग्या घनश्याम दरवडे यानं ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे जाऊन भेट घेतली.

Jan 16, 2016, 06:11 PM IST
अण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

अण्णांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. कॅनडा स्थित भारतीय नागरिक गगन विधू यानं फेसबुकच्या माध्यमातून कल्याणचे रहिवासी अशोक गौतम यांच्या फेसबुक अकाऊंटवर धमकी दिलीये. 

Mar 4, 2015, 08:16 PM IST

अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.

Mar 9, 2014, 08:58 PM IST

अण्णा-ममता दीदी साथ-साथ!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Feb 19, 2014, 04:26 PM IST

अण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!

दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.

Dec 28, 2013, 07:14 PM IST

<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश

राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.

Dec 18, 2013, 01:21 PM IST

राज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध

संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

Dec 15, 2013, 08:29 PM IST

जनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे

दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.

Dec 8, 2013, 12:02 PM IST