कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...

कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...

30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय. 

...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार

...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार

चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय. 

काँग्रेसच्या काळातली आणखी एक संस्था मोदी सरकारकडून निकाली

काँग्रेसच्या काळातली आणखी एक संस्था मोदी सरकारकडून निकाली

काँग्रेसच्या काळात स्थापन झालेल्या आणि गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारनं निकाली काढलेल्या संस्थांच्या यादीत आता आणखी एका संस्थेची भर पडली आहे. 

   पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

 वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे. 

91 लाख नवे करदाते, नवी ऑपरेशन क्लीन मनी वेबसाईट सुरु

91 लाख नवे करदाते, नवी ऑपरेशन क्लीन मनी वेबसाईट सुरु

नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाल्यावर देशाला 91 लाख नवे करदाते मिळाल्याचं अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्ट केलंय. 

भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबात जेटलींकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली

२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 

पर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं

पर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढतांना घसरले

अर्थमंत्री अरूण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढतांना घसरले

हरिद्वार जिल्ह्यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चढतांना अचानक घसरले. हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, ‘केंद्रीय अर्थमंत्री हेलीकॉप्टरमध्ये चढतांना घसरले पण ते ठिक आहेत आणि त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसून दिल्लीसाठी रवाना झाले.

मोदी सरकारचा मोठा झटका, या लोकांना बसू शकतो १०,०००पर्यंत दंड

मोदी सरकारचा मोठा झटका, या लोकांना बसू शकतो १०,०००पर्यंत दंड

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात लहान करदात्यांना जरुर दिलासा दिलाय. मात्र इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारखेनंतर जर कोणी टॅक्स रिटर्न भरत असेल तर लेट फी म्हणून त्या व्यक्तीस  ५००० रुपये भरावे लागतील.

माल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा

माल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा

देशात घोटाळे करून आणि कर्ज बुडवेगिरी करून देशातून फरार झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतात लवकरच कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. तशी घोषणाच आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली. 

बजेट २०१७ : काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग

बजेट २०१७ : काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग

नोटबंदीनंतर यंदाच्या बजेटवर सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. बजेटमधून दिलासा मिळणार की महागाई वाढणार यावर अनेकांचं लक्ष लागून होतं. बजेटमध्ये काय स्वस्त झालं आणि काय महाग पाहा.

अर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा

अर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा

देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.

पंजाबच्या विकासासाठी संधी द्या, भाजपची जाहीरनाम्यात साद

पंजाबच्या विकासासाठी संधी द्या, भाजपची जाहीरनाम्यात साद

पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.

1 जुलैपासून लागू होणार जीएसटी

1 जुलैपासून लागू होणार जीएसटी

बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.

'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'

'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'

देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे.

'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'

'नोटबंदीनंतर प्रत्यक्ष करात 14 टक्क्यांची वाढ'

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.