उरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट

उरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट

उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.

गणेशोत्सवात नागपूर पोलीस आणि ATS ची संयुक्तपणे मोहीम

गणेशोत्सवात नागपूर पोलीस आणि ATS ची संयुक्तपणे मोहीम

नागपूर पोलीस आणि ATS ने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

परभणी आयसीस कनेक्शन : कोर्टात धक्कादायक माहिती उघड

परभणी आयसीस कनेक्शन : कोर्टात धक्कादायक माहिती उघड

आयसीस कनेक्शनप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात एटीएसनं धक्कादायक माहिती कोर्टासमोर उघड केलीय.  

आयसिसचं परभणी कनेक्शन

आयसिसचं परभणी कनेक्शन

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.

प्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?

प्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहासह सहा आरोपींना क्लिन चीट देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवरचा मोक्काही हटवण्यात आला. काय आहे या घडामोडींचा अर्थ???

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद  विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात आहेत का ? याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.

पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी

पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी

पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय. 

मालवणीतून बेपत्ता अयाजवर गुन्हा दाखल

मालवणीतून बेपत्ता अयाजवर गुन्हा दाखल

मालवणीतून बेपत्ता झालेल्या 3 तरुणांपैकी अयाज सुलतान याच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तरुण आयसिसमध्ये शामिल होण्यासाठी गेले असल्याचा पोलिसांना संशय होता. 

मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक

मुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक

नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

मुंबईतील 3 बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून अटक

मुंबईतील 3 बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून अटक

आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील तीन तरूणांपैकी एका तरूणाला पुण्यात एटीएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथून 3 तरुण बेपत्ता झाले होते.

'त्या' दोन माओवाद्यांना एटीएस कोठडी

'त्या' दोन माओवाद्यांना एटीएस कोठडी

के. मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांना एटीएस कोठडी सुनावण्यात आलीय. 

पुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित

पुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित

पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय. 

अखेर महिन्याभरानंतर अफजल उस्मानी एटीएसच्या जाळ्यात

इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी अफजल उस्मानी अखेर एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. २० सप्टेंबरला उस्मानी मुंबईच्या मोक्का कोर्टातून पळून गेला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, भटकळ बंधूंचा खास साथीदार अफझल उस्मानीला आज पुन्हा जेरबंद करण्यात आलंय.

यासिनला महाराष्ट्रात आणणार?

यासिन भटकळची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचं पथक रवाना झालंय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिलीय. यासिन भटकळ हा वॉन्टेड अतिरेकी आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची नोंद आहे.

गृहविभागाकडून पोलिसांचं खच्चीकरण!

राज्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मनोधर्य वाढण्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच होत असल्याचं समोर येतंय. दहशतवाद्यांसोबत प्राणपणानं लढणाऱ्या एटीएस जवानांबाबत राज्याचा गृहविभाग उदासीन आहे

राज्यातली कॉल सेंटर्स ATSच्या रडारवर

राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.

बसमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट?

शुक्रवारी रात्री बीडमध्ये झालेला रेडिओ बॉम्बस्फोट चांगलाच शक्तीशाली होती असंच चित्र दिसतंय. बसमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा तर हा कट नव्हता ना? असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे त्याचदिशेनं सध्या तपास पुढे सरकतोय.

बीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या काळेगावमध्ये झालेल्या रेडिओच्या स्फोटात 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओम निंबाळकर या एसटी वाहकाच्या घरी हा स्फोट झालाय.

पुणे बॉम्बस्फोट : गोव्यात संशयिताला अटक

नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीचं नाव अफजल खान असं असल्याचं समजतंय.